इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 28
विषय – इतिहास – भूगोल

1 वरील चित्राचे निरीक्षण कर. चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची यादी कर.
2 यादीतील वस्तू आजही घरात वापरल्या जातात का? वापरत असतील तर त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो?
3. घरातील विविध भांडी व वस्तूंमध्ये कोणत्या धातूंचा वापर झाला आहे ते निरीक्षण कर. तांबे, स्टील, लोखंड यामध्ये वर्गीकरण कर.
खालील माहितीचा अभ्यास करा
आजही अनेक घरात प्रामुख्याने ग्रामीण भागात दगडाच्या वस्तू आढळतात. उदा. जाते याचा उपयोग धान्य दळण्यासाठी होतो, पाटावरवंटा यावर तिखट किंवा मसाला वाटला जातो. तु पहिले आहे कि पुराश्मयुगात कुशल मानव व ताठ कण्याच्या मानवाने दगडाची हत्यारे बनवली. कालांतराने या दगडी हत्यारात बदल होत गेला.
तु किंवा तुझे मित्र खेळताना दगडाचा वापर करत असतात. उदा. एखादी कठीण वस्तू फोडणे. म्हणजेच येथे तुम्ही दगड हे एक हत्यार म्हणून वापरतात. असे मानले जाते कि मानवाने सर्व अगोदर दगडाचा वापर केला. ख्रिश्चन थॉमसेन या अभ्यासकाने युरोपमधील विविध संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण केले. वर्गीकरणासाठी ख्रिश्चन थॉमसेन अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अमलात आणली. त्याने त्या वस्तूची वर्गवारी तीन गटामध्ये केली.
१. दगडाची हत्यारे
२. तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ३. लोखंडाची हत्यारे आणि इतर
१. दगडाची हत्यारे – ज्या काळात मानवाने दगडापासून बनवलेली हत्यारे वापरली, त्या युगाला
अश्मयुग म्हणतात.
२. तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ठात तांबे वापरायला सुरुवात झाली, त्या – ज्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते.
३. लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू – ज्या काळात लोखंड वापरायला सुरुवात झाली, त्या काळाला लोहयुग असे म्हटले जाते.
वरील वर्गवारी ठरवताना अगोदरच्या काळात दगडाची हत्यारे, नंतरच्या काळात तांब्याच्या हत्यारे आणि वस्तू आणि त्यानंतरच्या काळात लोखंडाची हत्यारे आणि वस्तू वापरल्या गेल्या. हे ख्रिश्चन थॉमसेन यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे या कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारण अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्व प्रथम वापरात आलेला •धातू होय.
प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात असलेला पहिला धातू आहे. सोने हा धातू निसर्गतः अत्यंत नरम आहे. सोन्यापासून हत्यारे किंवा अवजारे बनवू शकत नाही. त्यामुळे माणसाला सोन्याऐवजी एखादा कठीण धातू हवा होता. सोने या धातुनंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की, ज्यापासून त्याला हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य झाले, तो धातू म्हणजे तांबे. ताम्रयुगाच्या काळात तांबे या धातूपासून बनवलेली हत्यारे व वस्तू वापरायला सुरुवात झाली.
काय समजले ?
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
उत्तर : ………………………………………….


5. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी
Rất tâm đắc với đoạn này… (trích nội dung)
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy