इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 20

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  20  

विषय  -भूगोल  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१) तुम्हास नकाशावाचन करताना नकाशातील कोणकोणत्या बाबीचा उपयोग होतो ?

२) तुमच्या घराच्या परिसराचा आराखडा काढा .

खालील माहिती अभ्यासा

नकाशात दाखवलेले घटक सर्वांना सहजपणे समजावेत यासाठी सांकेतिक चिन्हे व खुणांचा वापर केला जातो. चिन्हे व खुणांचा वापर केल्याने त्या त्या ठिकाणांबाबत थोडक्यात व अचूक माहिती नकाशा वाचणाऱ्याला मिळते. चिन्हे व खुणा कशासाठी वापरल्या आहेत, ती माहिती नकाशाच्या सूचीत दिली जाते.

सांकेतिक खुणा :- नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखविण्यासाठी संकेतानुसार वापरलेल्या खुणा. या बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरुपात असतात. उदा. रेषा , वर्तुळ, त्रिकोण, बिंदू, इत्यादी..

सांकेतिक चिन्हे :- नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखविण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्हे चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टींसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृती होय. उदा. देऊळ, मशीद, किल्ला, इत्यादी.

पुढे दिलेल्या सांकेतिक खुणा व सांकेतिक चिन्हे यांचा अभ्यास करा.

1 thought on “इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 20”

Leave a comment