[ad_1]
फेक व्हॉट्सअॅप व्हर्जन्स
गेल्या काही दिवसांपासून क्लोन व्हायरल होत आहे. युजर्स कोणताही मागचा पुढचा विचार न करता याला डाऊनलोड करीत असतात. WhatsApp Plus आणि WhatsApp Gold यासारख्या नावाने आलेल्या या अॅप्समध्ये स्टँडर्ड अॅप पेक्षा वेगळे फीचर देण्यात आले आहे. या लालसेपोटी अनेक युजर्सं हे अॅप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करीत असतात. हे सर्व अॅप सुरक्षित नाहीत. तसेच युजर्संचे मेसेज सुद्धा सुरक्षित नाहीत. त्यामुळे अनेक अॅप्समध्ये मेलवेअर आणि स्वतः व्हॉट्सअॅपनेही या अॅप्सचा वापर करण्यास बंदी करणे सुरु केले आहे.
एनीडेस्क
एनीडेस्क अॅपच्या मदतीने खूप सारे फ्रॉड करण्यात आलेले आहे. त्यामुळे RBI आणि HDFC बँकेने या आधीच यासंबंधी इशारा दिलेला आहे. या सारखे अॅप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करु नका असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने दिला आहे. या अॅपमध्ये कोणतीही कमी नाही. याच्या मदतीने एका डिव्हाईसला अनेक दूर अंतरावरून कंट्रोल केले जाऊ शकते. परंतु, हॅकर याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे या सारखे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड न करणे हेच चांगले आहे.
कॉस कॅमेरा
सुपर सेल्फी अॅप प्रमाणे कॉस कॅमेरा अॅप मध्ये काही कमी आहेत. यामुळे थेट फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम करणे सुरू करतो. हे अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. परंतु, थर्ड पार्ट प्लॅटफॉर्म्सवर खूप सारे जण याला डाऊनलोड करतात तसेच शेअर करीत आहेत. हे अॅप इन्स्टॉल करु नका. जर चुकूनही तुम्ही हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केलेले असेल तर ते तात्काळ डिलीट करा. कॅमेरा आणि फोटो एडिटिंगसाठी तुम्ही प्ले स्टोरवरुन कोणताही अॅप डाऊनलोड करु शकता.
पॉप कॅमेरा
सायबर सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रो कडून सांगण्यात आले आहे की, हे अॅप कॅमेरा अॅप नसून एक प्रकारचे अॅडवेअर आहे. हे अॅप नॉर्मल मेलवेअर च्या तुलनेत अनेक जास्त खतरनाक आहे. हे अॅप अॅड स्पॅकिंग करण्यापेक्षा जास्त नुकसान पोहोचू शकते. तसेच तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा सोबत छेडछाड करु शकतो. जर चुकूनही तुम्ही याला तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले असेल तर तात्काळ हे अॅप डिलीट करा. हे अॅप डिलीड केले नाही. तर तुमची खासगी माहिती सार्वजनिक होण्याची भीती आहे. त्यामुळे या सारखे अॅप मोबाइल मध्ये न ठेवणे हेच शहाणपणाचे आहे.
पिक्सल ब्लर
अनेक आपल्याला फोटो ब्लर करण्यासाठी किंवा फोटो एडिट करण्यासाठी नवीन अॅप हवा असतो. सोशल मीडिया हँडल करीत असताना एडिटिंग अॅप खूप वेगाने प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडियावर फोटो ब्लर करुन ते व्हायरल केले जातात. जवळपास सर्वच युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त इमेज एडिटिंग अॅप इन्स्टॉल केलेले असतात. परंतु, Pixel Blur हे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा. हे अॅप अॅडवेअर आहे. ते फोनच्या बॅक ग्राऊंडला जाऊन काम करते. त्यामुळे तुमच्या काही खासगी गोष्टी असतील त्या सार्वजनिक होण्याची भीती आहे.
[ad_2]
Source link