covid warriors website : पंतप्रधान मोदींनी केली ‘कोविड वॉरियर्स’ वेबसाइट लाँच – prime minister narendra modi launched covid warriors website

[ad_1]

नवी दिल्लीः करोना व्हायरसवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात एक खास वेबसाइट लाँच केली आहे. या वेबसाइटचे नाव ‘कोविड वॉरियर्स‘ असे आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून संघटन, स्थानिक प्रशासन आणि सिव्हील सोसायटीतील कर्मचारी एकमेकांशी जोडले जाणार आहेत. देशातील लोकांसाठी ही खास वेबसाइट तयार करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

वाचाः
मस्तच! हुवेईच्या स्मार्ट टीव्हीत पॉप-अप कॅमेरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, कोविड वॉरियर प्लेटफॉर्मच्या माध्यमातून सामाजिक संघटन, स्थानिक प्रशासन आणि सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांना एकमेकांना जोडण्याचे काम करण्यात येईल. या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर्स, नर्स, आशा कर्मचारी, एनएसएसची माहिती उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर लोकांनी करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. या वेबसाइटवर करोना व्हायरस संदर्भातील माहिती मिळणार आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवर सर्व राज्यांचा डेटा उपलब्ध आहे. तसेच लोकांना या ठिकाणी डॉक्टरची माहिती मिळू शकते. तर दुसरीकडे यात विद्यार्थी, डॉक्टर, हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटलचे कर्मचारी, माजी सैनिक, फार्मसीचे कर्मचारी, आयुष विभागाचे कर्मचारी, लॅबचे कर्मचारी, एनसीसी आणि पंचायत सचिव यांची माहिती उपलब्ध आहे.

वाचाः
व्होडाफोन-आयडिया युजर्संना डबल डेटा ऑफर

भारतात सध्या २७ हजार ८९२ करोनाबाधीत आहे. ८७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर २० हजार ८३५ जणांवर उपचार सुरू आहेत. जगभरात आतापर्यंत २९७१४७५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २०६५४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १८९९१९८ जणांवर उपचार सुरू आहेत.

वाचाः
मस्तच! iQoo 3 स्मार्टफोन ४ हजारांनी स्वस्त



[ad_2]

Source link

Leave a comment