[ad_1]
शाओमीने एमआय१० हा स्मार्टफोन फेब्रुवारीत चीनमध्ये लाँच केला होता. तर ३१ मार्च रोजी भारतात हा फोन लाँचिंग करण्यात येणार होता. करोनामुळे हा फोन ऑनलाइन लाँचिंग करण्यात येणार होता. परंतु, आता ही लाँचिंग रद्द करण्यात आली आहे. शाओमी इंडिया व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विट करून एमआय १० ची लाँचिंग तारीख स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
We, at #XiaomiIndia, are focusing our energy to support the nation in its fight against #COVID19. After careful d… https://t.co/xsh25ShTNU
— Manu Kumar Jain (@manukumarjain) 1585128434000
शाओमीची एम सीरिज अंतर्गत लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्समधील एमआय१० सीरीज पहिला फोन आहे. ४ वर्षानंतर भारतात ही सीरिज लाँच करण्यात येणार आहे. भारतात आयात शुल्क आणि जीएसटी वाढ झाल्याने या फोनची किंमत वाढू शकते. चीनमध्ये एमआय १० ची किंमत ३,९९९ चीनी युआन म्हणजेच जवळपास ४२,५०० रुपये, तर एमआय १० प्रोची किंमत ४,९९९ चीनी युआन म्हणजेच ५३ हजार रुपये आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. हे ८ के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करते. एमआय १० मध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून ३० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. तर एमआय १० प्रो मध्ये ४७८० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून ५० वॅट चार्जिंग स्पीड सपोर्ट दिला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉयड १० बेस्ड मीयूआय ११ वर चालतो.
करोनाः कोणत्याही कंपन्यांचं नेटवर्क वापरता येणार?
[ad_2]
Source link
Cảm ơn bạn, mình học được rất nhiều.