coronavirus : करोनाः सर्व कर्मचाऱ्यांना फेसबुक देणार ७४ हजारांचा बोनस – coronavirus: facebook to give ₹75,000 bonus to every employee as cash support

[ad_1]

नव दिल्लीः अॅपल, गुगल, ट्विटर आणि फेसबुक यासारख्या असंख्य कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, फेसबुकने आज एक मोठी घोषणा केली आहे. घरातून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना फेसबुक १ हजार डॉलर म्हणजे जवळपास ७४ हजार रुपयांचा बोनस देणार आहे. फेसबुकमध्ये जवळपास ४५ हजार फुल टाइम कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत.

द इनफॉर्मन्सच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आहे. या मेलमध्ये करोना व्हायरसने प्रभावित झालेल्या छोट्या व्यवसायिकांना मदत म्हणून ३० देशांतील ३० हजार छोट्या व्यवसायिकांना ७४१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषनेनंतर पत्रकार अलेक्स हेल्थ यांनी म्हटले की, फेसबुकच्या १६ वर्षाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. जे की कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देत आहे. फेसबुकने नुकतेच एका कर्मचाऱ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आपले सिंगापूर आणि लंडन कार्यालय बंद केले आहेत. फेसबुकने हे दोन्ही कार्यालय साफसफाईसाठी बंद केले आहेत. ज्या कर्मचाऱ्याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. तो २३ ते २६ फेब्रुवारी रोजी लंडन कार्यालयात गेला होता.

सॅमसंगच्या ‘ब्लू फेस्ट सेल’मध्ये बंपर डिस्काउंट

मोबाइलवरून फोटो काढताना ‘या’ चुका टाळा

दीड मिनिटात रेडमी नोट ९ प्रो ‘आउट ऑफ स्टॉक’



[ad_2]

Source link

Leave a comment