चीनमधून आढळून आलल्या करोना व्हायरसने coronavirus सध्या संपूर्ण जगभर चर्चेचा विषय बनलेला आहे. परंतु आता हा व्हायरस चीन बरोबरच अनेक देशांमध्ये आढळून आलेला आहे त्यामध्ये का जपान ऑस्ट्रेलिया फ्रान्स आणि आता आपल्या भारतात देखील या करुणा व्हायरसचे काही रुग्ण आढळून आलेले आहेत.
मित्रांनो सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पसरायला फारसा वेळ लागत नाही. या करोना व्हायरस बाबत देखील असेच काहीसे झालेले आहे. आज-काल वर्तमानपत्र व सोशल मीडियावर या करोना व्हायरसमुळे किती लोक मरण पावले याविषयी नेहमी चर्चा होतांना आपल्याला दिसत आहे.
1.करोना व्हायरस इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापेक्षा भयानक असून त्याचा मृत्यूदर जास्त आहे.
याविषयी असंही म्हटलं जात आहे की, हा व्हायरस ज्याला होईल त्याचा मृत्यू अटळ आहे आणि म्हणूनच याच्याबद्दल भयंकर भीती लोकांच्या मनात आहे. पण तसं पाहिलं तर आत्तापर्यंत १४३८० लोकांना याची लागण झाली आहे तर आत्तापर्यंत त्यापैकी जवळपास ३०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
अशी जाहीर आकडेवारी आलेली आहे.
अगदीच गणिती आकड्यात बघितलं तर असे दिसते की. लागण झालेल्या लोकांपैकी दोन टक्के मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत. तशी दोन टक्के ही संख्या कमी नाही, तरीही जर गणितीय आकडेमोड करायचीच असेल तर,
इबोला रोगाची लागण झालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोक हे मृत्यू पावत. हे नको विसरुयात की, दरवर्षी फक्त अमेरिकेत इन्फ्लूएंजा मुळे ३००००० तर जगभरात जवळपास साडेसहा लाख मृत्यूमुखी पडतात.

2.करोना व्हायरस इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापेक्षा वेगाने पसरत आहे.
तसं पाहायला गेलं तर गोवर सगळ्यात वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे पण त्याची लस उपलब्ध असल्यामुळे आणि जन्मलेल्या बाळाला लगेच लस देत असल्यामुळे गोवर सध्या इतक्या वेगाने पसरत नाही.
करोना हा व्हायरस जर एकाला झाला तर त्यापासून त्यात तीन ते चार लोकांना त्याची लागण होऊ शकते. अर्थात अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे की, नक्की किती लोकांना याची बाधा होईल.
तसं पाहायला गेलं तर गोवर आणि खोकल्यामुळे अठरा-एकोणीस लोकांना त्याची लागण होऊ शकते.
3.करोना हा व्हायरस फार्मासिटिकल कंपन्यांच्या फायद्यासाठी बनवण्यात आला आहे
आता हा पण गैरसमज आहे की, हा व्हायरस जगभर पसरवण्यासाठी फार्मासिटिकल कंपन्यांना हाताशी धरलं आहे. याचं कारण म्हणजे हा व्हायरस पसरेल आणि त्याची लस घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागतील. जेणेकरून फार्मासिटिकल कंपन्यांचा त्यात आर्थिक फायदा होईल.
इंटरनेटवर याविषयी प्रचंड गोंधळ दिसून येतोय.
4 करोना हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार केला गेला आहे आणि मुद्दाम तो पसरवण्यात आलेला आहे
जेव्हा जेव्हा असे जीवघेणे आजार जगभर येतात तेव्हा तेव्हा त्या विषयी अनेक समज गैरसमज पसरवले जातात. तसेच ह्या बाबतीतही झालेलं आहे.
5.करोना व्हायरस रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि औषध उपलब्ध आहेत
करोना व्हायरसची बातमी जशी बाहेर आली तसं वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि औषधांसाठी सोशल मीडियावर जणू पेवच फुटलं. कदाचित फार्मासिटिकल कंपनी त्यापासून खूप फायदा मिळवणार नाहीत, पण काही हितसंबंधी लोक मात्र त्यातून नफा नक्कीच कमावतील.
हे खा, ते प्या त्यामुळे रोग होणार नाहीत. तसंच काहींनी खूप वेगवेगळे उपचार सांगितले जसं की, तुमचा घसा कायम ओला ठेवा त्यासाठी गरम पाणी पीत रहा, सतत गरम पाण्याच्या गुळण्या करा, याचा तुम्हाला कदाचित त्रास नाही होणार आणि जर तुमचा बडबड करण्याचा व्यवसाय असेल तर फायदाच होईल.
पण करोना व्हायरस वर आत्ता तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही.आताचा सध्याचा प्रतिबंधक उपाय म्हणजे बाहेर गेल्यावर कुठेही स्पर्श ना करणे आणि तो हात तोंडाजवळ न नेणे.
कुठूनही बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ धूत राहणे. कोणी आजारी असेल तर त्याला औषधोपचार देणे, पण शक्यतो अशा माणसांच्या खूप जवळ न जाणे.
6. करोना व्हायरसला रोखण्यासाठी लस शोधण्यात आलेली आहे
करोना व्हायरसला रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. लस तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ, पैसा आणि संशोधन गरजेचं आहे. त्यासाठी आधी या आजाराला कारणीभूत असलेला व्हायरस किंवा bacteria शोधावा लागेल.
त्यानंतर लस तयार करावी लागेल आणि त्या लसीच्या अनेक चाचण्या घ्याव्या लागतील. त्यानंतर ती वापरात आणली जाईल. म्हणजे, लस शोधली गेलीय हे म्हणणं चुकीचं आहे
7.कोणताही खोकला आणि ताप म्हणजेच करोना व्हायरस
ह्या व्हायरसची इतकी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे की, साधा खोकला आणि ताप आला तरी लोकांना वाटतंय की आपल्याला कारोना व्हायरसचं इन्फेक्शन झालंय

काही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत राहतात आणि त्यांच्यापासूनच खरंतर मोठा धोका आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नाही. त्यांना व्हायरस म्हणजे काय ह्याची पण कल्पना नसते.
त्या लोकांना आपल्या मध्ये सामील करणं आणि त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर करणं, त्यांना अशा रोगांचा सामना करण्यासाठी कुशल बनवणं खूप महत्त्वाचं आहे.