[ad_1]
अॅमेझॉन अॅपल डेज सेलमध्ये आयफोन एक्सआर फोनवर ५ हजारांची सूट दिली जात आहे. ६४ जीबीच्या या फोनची किंमत आधी ४९ हजार ९०० रुपये होती. परंतु, आता ती ४४ हजार ९०० रुपये झाली आहे. तर आयफोन एक्सआर १२८ जीबी च्या फोनवर तब्बल ३४ हजारांची बंपर सूट दिली जात आहे. या फोनची किंमत आधी ८१ हजार ९०० रुपये होती. परंतु, ३४ हजारांच्या बंपर सूटनंतर हा फोन केवळ ४७ हजार ९०० रुपयांना खरेदी करण्याची संधी आयफोन चाहत्यांना मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर १० हजार ५५० रुपयांचा आणखी फायदा मिळू शकतो. या सेलमध्ये दोन्ही फोनवर कोणताही डिस्काउंट दिला जात नाही.
एचडीएफसी बँकेकडून ऑफर दिली जात असून ६ हजारांचा तत्काळ डिक्साउंट दिला जात आहे. तसेच आयफोन ११ प्रोवर ६ हजारांचा तर आयफोन ११ प्रो मॅक्सवर ७ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन ११ प्रोचा ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, बँकेच्या डिस्काउंटनंतर हा फोन ९३ हजार ९०० रुपयातं खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन ११ प्रो मॅक्सचा ६४ जीबीच्या फोनवर एचडीएफसी बँकेकडून ७ हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन ९६ हजार ९०० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. या फोनची किंमत १ लाख ३ हजार ९०० रुपये किंमत आहे.
१७ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अॅपल वॉच सीरिज ४ वर ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पर्यायावर ४ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. या अॅपल वॉचची किंमत ७१ हजार ९०० रुपये आहे. परंतु, या सूटनंतर याची किंमत ४९ हजार ९०० रुपये होणार आहे.
फेसबुकवर Fake News ‘अशी’ ओळखता येईल
Realme C3 चा आज पहिला सेल; ‘ही’ ऑफर
[ad_2]
Source link