[ad_1]
ओरिजनल चार्जरने फोन चार्ज करा
नेहमी तुमचा स्मार्टफोन ओरिजनल चार्जरने चार्ज करा. फोनसोबत येत असलेला चार्जर व्यवस्थित सांभाळून ठेवा. जर अन्य चार्जरने फोन चार्ज केला तर याचा परिणाम फोनवर पडू शकतो. बॅटरी खराब होण्याची शक्यता आहे.
वाचाः ‘रेडमी’चा नवा स्मार्टफोन आज लाँच होणार
फोन चार्ज करण्याआधी कव्हर काढा
चार्जिंग करण्याआधी फोनचा कव्हर काढून ठेवा. अनेकदा कव्हर असल्याने चार्जरची पिन व्यवस्थित लागत नाही. तसेच चार्जिंगमुळे फोन गरम होता. त्यामुळे कव्हर नसेल तर चिंता करण्याची गरज नाही.
वाचाःभारतातील बेस्ट फीचर फोन, दमदार बॅटरी-टॉर्च
फास्ट चार्जिंगचे अॅप्स वापरू नये
फोनमधील बॅटरी वाचवणारे किंवा फास्ट चार्जिंगचे थर्ड पार्टीचे अॅप पासून सावध राहा. हे अॅप नेहमी बॅकग्राऊंडला चालत असतात. त्यामुळे बॅटरीवर जास्त प्रभाव पडू शकतो.
वाचाः आयफोन १२ ची किंमत iPhone 11 पेक्षा कमी
२० टक्के बॅटरी असल्यास फोन चार्ज करा
फोनची बॅटरी २० टक्के असल्यानंतर फोन चार्जिंगला लावा. जर फोनची बॅटरी चांगली असेल व फोन चार्जिंगला लावल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होऊ शकतो. तुमच्या बॅटरीसाठी जो पॉवरबँक उपयुक्त ठरेल तोच शक्यतो वापरा.
charging smartphone
[ad_2]
Source link