♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

boys locker room scandal: ‘बॉइज लॉकर रुम’ प्रकरण गाजतंय; पालकांनो, सावध राहा – read experts opinion about the boys locker room incident in delhi

[ad_1]

अजय उभारे

दिल्लीत साधारणपणे सतरा-अठरा वर्ष वयोगटातील मुलांनी इन्स्टाग्रामवर एक ग्रुप तयार केला. त्यांच्या वर्गातील आणि सोशल मीडियावरील मुलींचे फोटो त्यांनी मॉर्फिंग (कम्प्युटर टेक्निकच्या मदतीनं बदल केल्याचं उघड झालं. अनेक मुलींचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यातले फोटोही त्यांनी यासाठी वापरले होते. धक्कादायक बाब म्हणजे काही मुलीही ‘बॉइज लॉकर रूम‘ या ग्रुपचा भाग असल्याचं कळतंय. हा प्रकार उघड झाल्यानंतर हे इन्स्टाग्रामकडून हे पेज बंद करण्यात आलंय. परंतु, सोशल मीडियावर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

वाचाःवैज्ञानिकांनी शोधली अँटीबॉडी; ‘करोना’ला रोखणार

एका सामूहिक हिंसाचाराला खतपाणी घालणारी ही घटना असल्याचं म्हणत यावर टीका केलीय. दिल्ली पोलिसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली जातेय. शिवाय, ‘आय सेफ अलायन्स’ या संघटनेकडून एज व्हेरिफिकेशन आणि कंटेंट फिल्टर्सची मागणी केली जाऊ लागलीय. सध्या या प्रकरणातील गुन्हेगारांवर आयटी कायद्यांतर्गत विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वाचाः स्वस्त अन् मस्तः १२८ जीबी स्टोरेजचे ‘टॉप-५’ स्मार्टफोन

दिल्लीतील या खळबळजनक प्रकारामुळे आता देशभरातील पालकवर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा गुन्हेगारी प्रवृतीपासून आपल्या मुला-मुलींना लांब कसं ठेवावं याबद्दल चिंता व्यक्त होतेय. ‘रिस्पॉन्सिबल नेटीझम’चे उन्मेष जोशी यांच्याशी ‘मुंबई टाइम्स’नं संवाद साधला तेव्हा, त्यांनी पालकांसाठी काही सूचना दिल्या. कमी वयात गुन्हेगारी प्रवृतीला मिळणारा वाव याला इंटरनेटबरोबरच इतर अनेक गोष्टीही जबाबदार असल्याचं ते म्हणााले.

पालकांनो, हे करा…

० पालकांनी मुलांच्या मोबाइल किंवा इतर कोणतेही गॅझेट्स वापरावर वेळीच निर्बंध घालणं आवश्यक आहे. त्याअगोदर पालकांनी स्वतःच्या वापरावर निर्बंध घालावेत.

० मुलांना ऑनलाइन काय करावंसं वाटतं याबद्दल पालकांनी मुलांशी सतत बोलत राहणं अत्यावश्यक आहे.

० आपण काय करतोय, आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल योग्य ती माहिती मुलांना देणं.

० लैंगिक शिक्षणावर भर देऊन आपल्या मुलांशी योग्य वेळी त्याबाबत मोकळेपणानं बोला.

० सायबर लॉ आणि इतर कायद्यांविषयी मुलांना माहिती करून देणं

० पालक आणि मुलांमधील सततच्या योग्य संवादातून हे प्रकार टाळता येऊ शकतील.

वाचाःस्मार्टफोन फास्ट चार्जिंग करणाऱ्या खास टिप्स

का घडतात असे प्रकार?

० नको त्या वयात मुलांना मोबाइल आणि इतर गोष्टींची सवय लावणं. शिवाय कमी वयातच सोशल मीडिया प्रोफाईल नेहमी घातक ठरू शकतात.

० मुलांचं अश्लीलतेकडे वळणं आणि पालकांनी त्यावेळी केलेलं दुर्लक्ष हे अशा चुकांना खतपाणी देणारं ठरू शकतं.

० शारीरिक बदल आणि आकर्षण याविषयी अयोग्य विचार.

वाचाःजिओचा सर्वात स्वस्त प्लान, ३.५ रुपयात १ जीबी डेटा

तज्ज्ञ सांगतात…

कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत पालकांचा मुलांशी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आपली मुलं काय वापरतात, कोणत्या सोशल मीडिया साइटचा ते कोणत्या प्रकारे वापर करतात यावर पालकांचा कटाक्ष असणं अत्यावशक आहे. अनेकदा सोशल मीडियाचा योग्य वापर माहीत नसल्यामुळे या चुका घडतात. कुमार वयात आल्यानंतर त्यांच्यावरील बंधनं शिथिल केली, तरी प्रत्येक वेळी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद होणं गरजेचं आहे.

-उन्मेष जोशी (रिस्पॉन्सिबल नेटीझम)

[ad_2]

Source link

Leave a comment