या महिन्यापासूनच तुम्हाला आधारचे डिटेल्स दिल्यावर ई-पॅन कार्ड मिळण्यास सुरूवात होणार आहे.
तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड अगदी कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. या महिन्यापासूनच तुम्हाला आधारचे डिटेल्स दिल्यावर ई-पॅन कार्ड मिळण्यास सुरूवात होणार आहे. केंद्रीय महसूल सचिव अयज भूषण पांडेय यांनी याबद्दलची माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या यंदाच्या बजेटमधील प्रणालीच्या प्रस्तावात ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नसल्यामुळे ही प्रक्रिया सोपी असल्याचं सांगितलं जात आहे.
सहज आणि सोपी प्रक्रिया
यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुमचा आधार नंबर दिला की, तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पासवर्ड (OTP Password) येईल. ओटीपीच्या माध्यमातून आधार डिटेल्स तपासल्यावर तुम्हाला त्वरीत तुमचा पॅन नंबर उपलब्ध होईल. यानंतर तुम्हाला ई-पॅन कार्ड समोर दिसेल. तो ई-पॅन कार्ड डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता.
काय आहे उद्देश?
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा उद्देश हा बनावट पॅन कार्डला आळा घालण्याचा आहे. यामुळे मल्टीपल पॅन कार्ड बनणं बंद होईल. तुम्हाला जर इनकम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतील तर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आयटीआर फाइल करताना तुम्ही ही कार्ड लिंक केली असतील. याबद्दलची माहिती जर आयकर विभागाकडे असेल तर ती आपोआप अपडेट होईल.
सकारने 11 नोव्हेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 जणांनी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केलं आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यातच आता या नव्या योजनेमुळे ई-पॅन कार्ड मिळवणं आणखी सोपं होणार आहे
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Mình đã comment để cảm ơn bạn rồi, quá chất!
Đây đúng là content có tâm.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy