[ad_1]
या दोन टीव्हीपैकी एक ३२ इंचाचा टीव्ही आहे. तर दुसऱ्याची साइज ३९ इंच आहे. ३९ इंच टीव्हीचे मॉडेल ‘D40HDRS’ आहे. या टीव्हीची किंमत १६ हजार ४९० रुपये आहे. तर ३२ इंचाच्या टीव्हीचे मॉडेल ‘D32S7B’ असून त्याची किंमत ९९९० रुपये आहे. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या टीव्हीची वॉरंटी दोन वर्षाची दिली आहे. दोन्ही टीव्हीत क्वॉड कोर प्रोसेसर सह अँड्रॉयड ओरियो ८.० दिला आहे. टीव्हीचा स्क्रीन रिझॉल्यूशन १३६६X७६८ पिक्सल आहे. या टीव्हीत ए-प्लस ग्रेडचे पॅनलचा वापर करण्यात आला आहे. लुमिनिट टेक्नॉलॉजी तुम्हाला १७८ डीग्री वाइड अँगलची मदत मिळणार आहे. टीव्हीचा रिफ्रेश रेट ६०एचझेड आहे. यात सिनेमा मोड देण्यात आला आहे, असा कंपनीचा दावा आहे.
या दोन्ही टीव्हीत ब्लूटूथ देण्यात आला आहे. यात २० वॅटचा बॉक्स स्पीकर दिला आहे. दोन्ही टीव्हीत बिग वॉल यूआय मिळणार आहे. या अंतर्गत युजर्सना १७ लाखांहून अधिक तासांपर्यंतचा व्हिडिओ कंटेट मिळणार आहे. तसेच टीव्हीत हॉटस्टार, जी५, सोनी लिव आणि जिओ सिनेमा यासारखे अॅप्स मिळणार आहेत. यात ई-शेअरसोबत दोन यूएसबी आणि दोन एचडीएमआय पोर्ट दिले आहेत.
[ad_2]
Source link