भारतातील पहिला 5G स्मार्टफोन २४ फेब्रुवारीला लॉन्च होणार

[ad_1]

नवी दिल्ली : First 5G smartphone in India स्मार्टफोन कंपनी ‘realme’ भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही पहिला ५जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं नाव ‘X50 Pro 5G’ असून कंपनी हा फोन दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता लॉन्च करणार आहे.

फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘realme x50 pro 5g’ चा एक टीजर शेअर करत कंपनीने यात काही फीचर्सबाबत माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 20X हायब्रिड झूम सपोर्ट, फोटो आणि व्हिडिओ मोडमध्ये स्विचिंग सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कॅमेराबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु यात १३ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा वापर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘गिजमो चायना’ने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये, Super AMOLED स्क्रिन असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये Full HD+ डिस्प्ले, स्क्रिन रिजॉल्यूशन २४०० x १०८० pixels, Qualcomm Snapdragon 865 SoC प्रोसेसर असेल. 

त्याशिवाय, Snapdragon X55 5G मोडेम, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असणार आहे.  कंपनीने ट्विटरवर या फोनच्या लॉन्च इव्हेंटबाबत एक  टीजर पोस्ट केलं आहे. 

स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीही आहे. यात 65W SuperDart चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.



[ad_2]

Source link

Leave a comment