[ad_1]
BSNL ने नुकतेच दोन प्लान आणले आहेत. ९६ रुपयांचा एक तर २३६ रुपयांचा दुसरा प्लान लाँच केले आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १० जीबी डेटा दिला जाणार आहे. जास्त डेटाचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी BSNLने हे प्लान आणले आहेत. ९६ रुपयांच्या नवीन ४ जी प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. प्लानमध्ये दररोज १० जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण २८० जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये कोणताही कॉलिंग फ्री किंवा एसएमएस फ्री नाही, हे विशेष. तसेच २३६ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता असून ग्राहकांना दररोज १० जीबी डेटा दिला जात आहे. ९६ रुपयांच्या प्लानप्रमाणे ग्राहकांना कोणतीही कॉलिंग फ्री किंवा एसएमएस फ्री मिळणार नाही.
स्पीडच्या तुलनेत बीएसएनएल ४जी, एअरटेल आणि रिलायन्स जिओपेक्षा थोडे मागे आहे. बीएसएनएल सब्सक्राईबर्सला ४ जी प्लान्समध्ये जवळपास 10Mbps ची इंटरनेट स्पीड मिळणार आहे. गेल्या काही महिन्यात बीएसएनएलने आपली ४ जी सेवा विस्तारित केली आहे. बीएसएनएलचे हे दोन्ही प्लान सध्या केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कोलकाता, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलमध्ये उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या ४ जी सेवेचा आनंद लुटण्यासाठी ग्राहकांना ३ जी सिमला ४ जीमध्ये रिप्लेस करावे लागेल.
Poco X2 चा आज भारतात पहिला सेल
[ad_2]
Source link