फोन विकण्याआधी करा हे काम, अन्यथा खाजगी डेटा होईल लीक

जुने फोन विकताना अनेकदा आपण केवळ त्यातील सिमकार्ड आणि एसडी कार्ड काढून घेतो. मात्र त्यातील अनेक गोष्टी डिलीट करणे अथवा काढण्यास आपण विसरतो. अनेकदा आयडी लॉग आउट करण्यास विसरतो, ज्यामुळे आपली खाजगी माहिती दुसऱ्यापर्यंत पोहचते. स्मार्टफोन विकण्याआधी काय करणे गरजेचे आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.


फोन विकण्याआधी त्यातील सोशल मीडिया अकाउंट लॉग आउट करा. त्यानंतर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन फॅक्ट्री रिसेट करा. त्यानंतर तुम्हाला सेटिंग्समध्ये बॅकअप अँड रिसेट पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला रिसेट फोन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व डेटा डिलीट होईल.


फोनचा डेटा बॅकअप नक्की घ्या
फोन विकण्याआधी अथवा बदलण्यापुर्वी फोनमधील महत्त्वाचा डेटा नक्की बॅकअप करा. यामुळे तुमचा डेटा लीक होणार नाही. बॅकअपसाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन बॅकअप पर्याय निवडावा लागेल. यामुळे तुमचे फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होतील.


गुगल लॉग आउट –
फोन विकण्याआधी गुगल अकाउंट लॉग आउट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये युजर अँड अकाउंट्स या पर्यायावर जावे लागेल. यानंतर तुम्हाला रिमूव्हचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट लॉग आउट होईल.


पासवर्ड काढून टाका –
स्मार्टफोन विकण्याआधी सेव्ह केलेले पासवर्ड काढून टाका. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची खाजगी माहिती दुसऱ्यापर्यंत पोहचू शकते. यासाठी तुम्हाला ब्राउजरमध्ये जाऊन सेव्ह पासवर्ड पर्याया निवडावा लागेल. येथे तुम्हाला प्रत्येक वेबसाईटचा पासवर्ड दिसेल. हे पासवर्ड डिलीट करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पुढे देण्यात आलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर रिमूव्हचा पर्याय असेल.

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment