[ad_1]
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन टेक समिट २०१९ मध्ये शाओमीने याची माहिती दिली होती. एमआय १० स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरसह येणारा हा फोन असणार आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल झूम सपोर्ट असण्याचे संकेत Xiaomi ने दिले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये मल्टी कॅमेऱ्याचा सेटअप असल्याचे संकेत दिले आहेत. Mi 10 सह शाओमीचा आणकी एक स्मार्टफोन Mi 10 Pro सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम असण्याची शक्यता आहे. कंपनीने याची याआधीच ही माहिती दिली आहे. 10 सीरीज़ मध्ये LPDDR5 RAM असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
शाओमी एमआय १० मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर असणार आहे. तसेच या फोनला ५ जी सपोर्ट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्याची शक्यता आहे. हा Samsung ISOCELL Bright HMX सेन्सर आहे. यात ४८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. एमआय१० प्रो मध्ये ६५ वॅट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. एम सीरिजमधील दोन्ही फोनमध्ये होल पंच डिस्प्ले डिझाइन देण्याची शक्यता आहे. या डिझाइनची झलक सॅमसंग गॅलेक्सी एस१० सीरिजमध्येही पाहायला मिळाली होती. बार्सिलोनत लाँच करण्यात आल्यानंतर Xiaomi आपला एमआय १० सीरिजला भारत आणि अन्य मार्केटमध्ये उतरवणार आहे.
Nokia मध्ये नवं फीचर, नेटवर्क विना करा कॉल
[ad_2]
Source link