नमस्कार आज आपण या पोस्ट मध्ये माहीती घेणार आहोत की कमी वेळात आपण संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास झटपट कसा कराल? या विषयीच्या महत्त्व पूर्ण टिप्स SSC Board exam Tips
इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते आपण वर्षभर त्यासाठी खूप मेहनत देखील घेत असतो. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये जर आपण काही टिप्स वापरल्यात आपल्या मार्गामध्ये निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल.चला तर मग जाणून घेऊया की आपणSSC Board exam मध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी वेळात कशाप्रकारे तयारी करू शकतो.
1. स्मार्ट अभ्यास- मित्रांनो आता आपल्याकडे कमी वेळ आहे तेव्हा कमी वेळामध्ये आपल्याला जर मार्क मिळवण्यासाठी करायचे आहेत आपण शेवटच्या खूप कष्ट घेण्यापेक्षा स्मार्ट अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. या स्मार्ट अभ्यासामध्ये आपण महत्त्वाच्या घटकांवर अधिक भर देणे गरजेचे आहे..
२. मागील पेपरचा आढावा – मित्रांनो SSC Board exam चा पॅटर्न ठरलेला असतो दरवर्षी त्यामध्ये अगदी थोडेसे बदल होत असतात परंतु बहुतांशी पैठण हा तोच असतो त्यामुळे जर आपण मागील वर्षी चा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास विचारपूर्वक केला तर आपल्या लक्षात येईल की कोणत्या घटकाला जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे. कोणत्या घटकावर अधिक भर देण्यात आलेला आहे. अशा घटकांवर आपण देखील फोकस करून. SSC Board exam मध्ये चांगले मार्क सहज मिळू शकतो.
३. थेरॉटिकल आणि न्यूमरीकल प्रश्नां – साठी कसा आणि किती गुणांचं वेजेट दिलं जातं याचा अंदाज आपल्याला यामुळे येईल. याशिवाय बोर्डासाठी मागच्या दोन वर्षात कोणता धडा सर्वात महत्त्वाचा होता याचा अंदाजही येईल. अर्थात अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न बदलला नसेल तरच हे शक्य आहे.
४. जास्त वेटेज असणारे प्रश्न – जास्त वेजेट असणाऱ्या विषयांना आधी प्राधान्य द्या. पर्यायी प्रश्न किंवा 15 मार्काला असणारे पर्यायी प्रश्न सोडवण्यावर भर द्या. कारण 7 किंवा 8 मार्कांच्या प्रश्नांना 6 ते साडेसहा पर्यंत मार्क मिळतात तेच 15 मार्कांच्या प्रश्नांसाठी मात्र तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी फार कमी असते.
५. प्रश्न सोडवण्याचा क्रम – मित्रांनो परीक्षांमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रश्न सोडवण्याचा ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. आपणास जे प्रश्न सोपे वाटत आहे व त्याचे उत्तर ने आपणास खात्रीशीर माहिती आहेत असे प्रश्न आपण अगोदर सोडवले पाहिजेत. परंतु हे करत असताना आपण प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा क्रमांक अचूक नोंदवणे गरजेचे आहे. यामध्ये छोटी उत्तरे असणारे प्रश्न अगोदर सोडवल्यास आपला आत्मविश्वास देखील वाढतो व चांगले मार्क मिळवण्यास त्याचा फायदा होतो.
६. मोठ्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना- अतिशय काळजीपूर्वक येत आहे त्यामध्ये प्रश्नांशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.मोठ्या प्रश्नांची उत्तरं तयार करताना मुद्दे लिहा आणि मुद्दे लक्षात ठेवा. हे मुद्दे आपल्या भाषेत पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता. कारण आपण एखाद्या प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर जितक्या लिहून चे चांगले मार्क मिळण्याची शक्यता असते त्यामुळे मोठ्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना जास्तीत जास्त मुद्द्यांचा समावेश करावा.
७. मोठी उत्तरे लक्षात ठेवण्याची टिप्स- मित्रांनो SSC Board exam मध्ये मोठ्या प्रश्नांना मार्क देखील जास्त असतात. अशा प्रश्नांची उत्तरे जास्त लिहिणे आवश्यक असते अशी उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी आपण प्रश्नांची मुद्दे काढून जर ते मुद्दे लक्षात ठेवले आपण त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू शकतो. उत्तर जितके मोठे लिहायचे असेल तितकी जास्त मुद्दे आपण काढणे आवश्यक आहे
८. वेळेचे महत्व व नियोजन- मित्रांनो SSC Board exam मध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला वेळेला खूप महत्त्व देणे आवश्यक असते कारण प्रश्न सोडवणे आवश्यक असते तेव्हा मित्रांनो SSC Board exam प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेचे नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेचे मधील एकही प्रश्न सुटणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे..
९. वेळेनुसार प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव- मित्रांनो परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला SSC Board exam पेपर सोडवण्याचा सराव करण्याची अतिशय आवश्यकता असते कारण दिलेल्या वेळामध्ये आपण ठराविक प्रश्नपत्रिका सोडू शकतो का याचा आत्मविश्वास आपल्याला असा सराव केल्यानंतरच मिळू शकतो.
१०. आत्मविश्वास- मित्रांनो असं म्हटलं जातं की आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे,SSC Board exam मध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला हाच आत्मविश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे. कारण वर्षभर आपण भरपूर अभ्यास केलेला असतो आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळणारच आहेत पेपर चांगल्याप्रकारे लिहिणार आहोत विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला असणे आवश्यक आहे पण परीक्षेत चांगले मार्क मिळू शकतो तेव्हा अभ्यासाबरोबर आत्मविश्वास असणे देखील प्रचंड गरजेचे आहे..
तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण SSC Board exam मध्ये चांगले मार्क मिळवायचे कसे याविषयी वरील पोस्टमध्ये माहिती घेतली या पोस्ट द्वारे आपल्या आपले मार्क चांगले मिळवण्यासाठी फायदा होईल वरील टिप्स हा फक्त आपणास माहिती करत आहेत आपण आपल्या नियोजनानुसार आपल्या अभ्यासानुसार वापर करावा. आपल्या सर्व मित्रां पर्यंत जास्तीत जास्त हि पोस्ट शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल..