iphone 11 : ‘आयफोन११’ सारखा स्मार्टफोन फक्त १० हजार रुपयात – itel upcoming smartphone suggest iphone 11 like dual cameras launch set in february

[ad_1]

नवी दिल्लीः आयटेल itel भारतात नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. आयटेलच्या या फोनची डिझाइन आयफोन ११ सारखी असणार आहे. हा आयटेलचा पहिला स्मार्टफोन आहे. यात वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. आयटेलच्या आगामी फोनचे नाव काय असणार आहे किंवा मॉडेल नंबर काय असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून सांगण्यात आली नाही.

लिक झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे. यात एक फ्लॅश लाइट सुद्धा असणार आहे. कॅमेऱ्याची डिझाइन ही आयफोन ११ सीरिज सारखी असणार आहे. लिक झालेल्या फोटोवर DikhaoApnaJaadu असा हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. आयटेलच्या या फोनची लाँचिंग या महिन्यात होणार आहे. हा फोन आयफोन ११ सारखा असणार असला तरी या फोनची किंमत फक्त १० हजार रुपये असणार आहे. आयटेलच्या या फोनचा सामना रियलमी सी ३ आणि रेडमी ८ या फोनसोबत होणार आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह बॅटरी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) चा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर मिळणार आहे. २०१९ मधील चौथ्या तिमाहीत ५ हजार रुपये किंमतीच्या फोनमध्ये आयटेल दुसऱ्या स्थानावर आहे, असे काउंटरपॉइंटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. फीचर फोनच्या मार्केटमध्ये आयटेलचे २२ टक्के शेअर आहेत.

लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल

इंटरनेटवर वेळ घालवण्यात भारत जपानच्या पुढे

फेसबुकसह ‘या’ टॉप सोशल नेटवर्किंग साइट्स

फ्लिपकार्टवर २४ इंच LED टीव्ही ५ हजारांत



[ad_2]

Source link

Leave a comment