[ad_1]
Poco X2 स्मार्टफोन तीन रंगात आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. पोकोचा हा फोन ११ फेब्रुवारी २०२० पासून दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट Flipkart सेलवर उपलब्ध असणार आहे. ICICI Bank च्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI वर खरेदी केल्यानंतर ग्राहकांना १ हजारांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा ऑस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यात Adreno 618 GPU सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर पॉवर्ड आहे. यात लिक्विडकूल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या फोनमध्ये २७ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सह ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अवघ्या ६८ मिनिटात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
#POCOX2 key specs: – #120HzDisplay. – 64MP IMX686 Quad cam. – 20MP+2MP in-screen front cam. – SD 730G+LiquidCool Te… https://t.co/xsU31pYWQ0
— POCO India (@IndiaPOCO) 1580800646000
सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला २ कॅमेरे देण्यात आले आहे. यात एकूण ६ कॅमेरे देण्यात आले आहे. रियरमध्ये ४ कॅमेरे आहेत. प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर आहे. पाठीमागे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये IR blaster देण्यात आला आहे.
लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल
इंटरनेटवर वेळ घालवण्यात भारत जपानच्या पुढे
[ad_2]
Source link