पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

वर्तमान पत्रातील बातमी जाहिरात मुलांना वाचून दाखवून वाचण्यास सांगून त्यावर

चर्चा घडवून आणावी.

मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आज रायगड आणि रत्नागिरीला मात्र रेड अलर्ट जारी

करण्यात आला आहे.

4 सक्षम बनू या

वाचलेल्या साहित्याचे आकलन कितपत यासाठी मुलांना लेखन साहित्यावर आधारित विविध प्रश्नाची उत्तरे लिहिण्यास सांगावे.

उदा. ऑरेंज अलर्टकोणत्या शहरात आहे? रेड अलर्ट कोणकोणत्या शहरात आहे ?

4 सव करू या

मुलांचे गट तयार करून अशा आणखी काही बातम्या, त्यावर आधारित प्रश्न निर्मिती करण्यास सांगावी. यामुळे बातमी / जाहिरातीचे हे विद्यार्थ्यांना आकलन होईल.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका: 29

समजून घेऊ या विसर्गातील बदल.

संदर्भ : इ. 3 री, पाठ 25 अवतीभवती होणारे बदल.

अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली विक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांच आणि आकृतीबंधाबद्दल भाकीत करतात.

लक्षात घेऊ या :

दिवस व रात्र – सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो व हळूहळू वरच्या दिशेला सरकू लागतो. सकाळी ऊन कोवळे असते व सावल्या लांब पडतात. सूर्य डोक्यावर आला की, ऊन कडक असते व सावली खूपच लहान असते. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे सरकू लागतो व सावल्या लांब होऊ लागतात. या वेळेला संध्याकाळ म्हणतात. या वेळेस आकाशात लाल पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. इतर वेळेला आकाश निळे असते. सूर्य मावळला की रात्र होते. रात्री सर्वत्र अंधार असतो. अशा वेळी आकाशात आपल्याला चांदण्या तसेच चंद्र दिसतो.

पहाटेपासून रात्रीपर्यंत संपत आली, की पहाटे पक्षाचा किलबिलाट सुरु होतो. कोंबडा आरवला की, पहाट झाली, हे आपल्याला कळते. फुलझाडांच्या कळ्या उमलू लागतात. मधमाश्या फुलपाखरे फुलांनोवती गोळा होतात. पक्षी घरट्यातून अत्र शोधायला बाहे पडतात. शेतकरी, गुराखी तसेच सर्व लोक कामासाठी घराबाहेर पडतात. संध्याकाळ झाली, की सर्व जण घराकडे परततात. पक्षी, गाई-गुरे आपापल्या विवान्यात येतात. परंतु काही प्राणी हे रात्री अन्न शोधायला बाहेर पडतात, त्यांना निशाचर म्हणतात. उदाः याच वटवाळ तसेच काही फुले ही रात्री उमलतात. उदा रातराणी, निशिगंध

विसर्गातील बदल आपल्या आजूबाजूला निसर्गात सतत बदल होत असतात. या बदलांचे निरीक्षण आपण सतत करायला हवे व असे बदल का होतात या यात आपल्या शिक्षकांना व मोठ्यांना प्रश्न विचारावेत, म्हणजे आपल्याला यामागचे कारण समजेल.

सराय करू या :

1. सकाळी सूर्य उगवताना, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशाचे निरीक्षण करा. आकाशाच्या रंगामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा.

2. रात्री आकाशात चांदण्या दिसतात, तक्षा दिवसा का दिसत नाहीत?

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.