पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस एकोणतीस | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणारे निरनिराळे अनुभव व त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया

याविषयी प्रश्न विचारतील.

उदा. १. तुमचा वाढदिवस कधी असतो?

२. त्या दिवशी तुम्ही काय काय करता ?

३. तुमची आई तुमच्यासाठी काय बनवते? इत्यादी

वरील प्रश्नांचा संदर्भ घेवून विद्यार्थ्यांना वाढदिवस कसा साजरा केला याचे अनुभव लिहिण्यास

सांगतील

★ सक्षम बनू या

आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांचे लेखन करताना कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल ? वर्णन लिहिताना मुद्देसूद असावे. अनुभव लेखन भरकटत जावू नये. योग्य भाषेचा वापर असावा. अनुभव लेखनातील ठिकाणे, वेळ, पात्र याविषयी स्पष्टता असावी. अशा विविध मुद्द्यांचा वापर अनुभव लेखनात करून ते प्रभावी कसे होईल याविषयी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

‘माझा शाळेतील पहिला दिवस’ या विषयावर विद्यार्थ्यांना अनुभव लेखून करण्यास सांगतील .

4 सराव करू या

शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेची परिसर महल’ या विषयावर प्रत्येकाला अनुभव लेखन

करण्यास सांगतील.

कल्पक होऊ या

1. ‘कोरोनामुळे शाळेला अचानक लागलेली सुट्टी’ या विषयावर तुमचे अनुभव लेखन करा.

2. तुम्हांला आतापर्यंत आलेल्या एखाद्या चांगल्या वाईट अनुभवाचे लेखन करा.

३. तुमची स्वतःची रोजची दैनंदिनी लिहा..

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन निष्पत्ती 04.95A.15 नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ

दाखवतात

पहिले काही आठवूया उत्तरे सांगा.

1. आपल्या परिसरात कोणते खाद्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?

2. आपल्या राज्यात जे खाद्यपीक मोठ्या प्रमाणात होते तेच खाद्य पिक अन्य कोणत्या राज्यात पिकवत जाते

3. तेल कोणत्या पिकापासून मिळते ?

वर दिलेला आहे.

अन्नातील विविधता हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ३६,३७,३८,३९,४०

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1. आपल्या जिल्हयातील प्रमुख पीक कोणते आहेत ?

2. आपल्या राज्यातील प्रमुख तेल वियांचे पीक कोणते ?

3. गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थबनवले जातात ?