पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सव्विसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

कृती १ नमुन्यादाखल तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील कविता शिक्षकांनी मुलांना वाचून

दाखवण्यास सांगावी

(बालभारती इ. ३ री पृष्ठ क्र ४३) कृती २ शिक्षकांनी मुलांच्या कविता वाचानातल्या लकबींचे निरीक्षण करावे व अंदाज घ्यावा. काही त्रुटी शिक्षकांच्या सहज लक्षात येतील जसे, गद्य स्वरूपात वाचन करणे, वाचनात तयबद्धता नसणे, एकसुरी पद्धतीने वाचन करणे इत्यादी.

+ सक्षम होऊ या

कृती १ विद्यार्थ्यांच्या कविता वाचनातील त्रुटी लक्षात घेऊन शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन करावे. उदा. कविता वाचन आणि कविता गायन यातील फरक सांगणे, यमक जुळणारे शब्द लक्षात आणून देणे. एका विशिष्ट लयीत तालबद्ध पद्धतीने कवितेचे वाचन करणे, हावभावासहित कवितेचे वाचन करणे, कवितेतील शब्दांचे वेगळेपण मुलांच्या लक्षात आणून देणे, नवीन शब्दांचे अर्थ सांगणे, त्याचप्रमाणे कवितेच्या भावार्थाकडे मुलांचे लक्ष वेधणे इत्यादी गोष्टींचे विवेचन करावे.

4 सराव करू या

कृती १ मुलांना वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मुलांना उपलब्ध करून द्याव्यात. कृती २ आवश्यक तेथे मुलांना कविता वाचताना मदत करावी. (उदा. कोणते शब्द कुठे तोडायचे, कोणते शब्द पटकन वाचायचे, वाचताना नेमके कुठे थांबायचे आवाजात चढ उतार कसे वापरायचे इत्यादी.)

कल्पक होऊया

काही गोष्टींच्या पण कविता आहेत ज्या आपल्याला माहित आहेत त्या कवितांची मुलांना आठवण करून द्यावी (उदा. ससा तो ससा ) मुलानी, अशा गोष्टींच्या कविता शोधून आणा

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका: 26

समजून घेऊ या वयानुसार शरीरात होणारे बदल

संदर्भ : इ. 3री, पाठ 23 वय जसजसे वाढते

अध्ययन निष्पत्ती प्राणी, पक्षी यांचे वैशिष्टये यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेर्दाचा वापर करून

गट तयार करतात.

लक्षात घेऊ या :

खालील चित्राचे निरीक्षण करा. खालील चित्रात चिंटू, त्याचे वडील व आजोबा दिसत आहेत.

चित्रात मुलगा, त्याचे वडील व आजोबा तुम्ही कसे ओळखाल ? चिंटू वयाने सर्वात लहान आहे. तर आजोबांचे वय सर्वात जास्त आहे. वयानुसार शरीरात बदल होत असतात.

बाळाचा जन्म झाल्यापासून ते हळूहळू मोठे होऊ लागते. त्याची वजन व उंची वाढू लागते. वयाच्या १८ वर्षांपर्यंत शरीराची वाढ पूर्ण होते. त्यानंतर शरीरात वाढ होत नाही. मात्र आरोग्यानुसार वजन कमी जास्त होत असते. वय वर्षे ४० पर्यंत व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते. या वयापर्यंत व्यक्ती तरुण असते. वयाच्या ४० च्या वर्षानतरही शरीरात बदल होत असतात. केस पांढरे होतात व डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते, त्यामुळे चष्मा लागतो.

वय जसे वाढत जाते तसे शरीरात ताकद कमी होते, दात पडतात, स्मरणशक्ती कमी होते व विविध आजार जडतात. याला म्हातारपण म्हणतात. शरीर हळूहळू काम करणे बंद करते व एक दिवस मृत्यू होतो. प्रत्येक सजीवाचा एक दिवस

मृत्यू असतो.

माणसाप्रमाणेच प्रत्येक प्राणी व वनस्पती यांची सुद्धा जन्मापासून वाढ होत असते, शरीरात बदल होतात व शेवटी

म्हातारपणामुळे मृत्यू होतो.

सराव करू या :

1. म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो ? तुमची व तुमच्या आजी आजोबांची त्वचा याचे निरीक्षण करा.

2. लहान बाळाला काही आजार होऊ नये म्हणून लसी दिल्या जातात, लहान बाळाला कोणकोणत्या लसी देतात, याची

माहिती मोठ्यांना विचारून लिहा.

3. मोठ्यांना विचारून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. अगदी लहान बाळांना भात का भरवत नाहीत ? त्यांना कोणते अन्न देतात ?

ब. छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात होते ?

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे २०

क. छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते ?

ड. छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात ?

4. आपल्या शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण योग्य वयात योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या

आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा ?

5. उपक्रम – कुंडीमध्ये वालाची एक बी लावा. बी पासून रोप कसे तयार होते व रोपाची वाढ कशी होते याचे निरीक्षण करा. केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवा.