पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
शिक्षकांनी काही शब्द फळ्यावर लिहून त्या शब्दांना जोडून येणारे शब्द कोणते ते
विद्यार्थ्यांना विचारावे.
उदा. आरडा, केर, शेती इ.
किंवा
शिक्षकांनी अर्धे असलेले जोडशब्द यांची शब्दकार्डे घ्यावे व शब्दकार्ड असलेल्या गटातून उरलेला
शब्द विद्यार्थ्यांना शोधायला सांगावे.
सक्षम बनू या
शिक्षकांनी काही जोडशब्द फळ्यावर लिहावे ते शब्द विद्यार्थ्यांना वाचायला सांगावे . त्यानंतर काही अर्धे शब्द लिहून त्या शब्दांना कोणते शब्द जोडता येतील याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. जोडून येणारे शब्द कसे असतात, ते कसे तयार होतात याची उदाहरणे देऊन शिक्षकांनी स्पष्ट करावे.
एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द एक अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोडशब्द
दोन वेगळी व एकाच गटातील नामे
एकाच अर्थाचे दोन शब्द याची उदाहरणे देतील.
उदा. हिरवे हिरवे, ओबडधोबड, शंखशिंपले, पांढराशुभ्र इ.
शिक्षकांनी यासारख्या जोडशब्दांचे वाक्यात उपयोग करुन दाखवावा. विद्यार्थ्यांना जोडशब्द तयार करायला सांगावे व त्यांचा वाक्यात उपयोग करायला सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया:- उत्तरे सांगा.
1) आपल्या हाताचा पंजा रंगात बुडवून वहीवर मारल्यावर काय होईल?
2) आपल्या घरातील सर्व खोल्या सारख्या आकाराच्या असतात का ?
3) शाळा आणि घराच्या खोली मध्ये काय फरक असतो ?
नकाशा आणि खुणा :- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ८६,८७,८८,८९,९० वर दिलेला आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1. नकाशाची अंगे कोणती आहेत ?
2. झाडे दाखवण्यासाठी नकाशात काढतात त्याचा रंग कसा असतो?
उपक्रम :- 1) आपल्या घराचा / गावाचा शहराचा नकाशा काढा