पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी आपल्या वर्गातला व वर्गाचे वेळापत्रक मुलांना दाखवावे. त्यावर आधारित विविध प्रश्न विचारावेत, जसे की

१) हे काय आहे ?

२) याचा आपल्याला काय उपयोग होतो ?

३) विषय, वेळ, वार लिहिल्यामुळे काय फायदा झाला ?

४) असेच आणखी कोण कोणत्या ठिकाणी तुम्ही रकान्यात लिहिलेली / तक्त्यात

लिहिलेली माहिती पाहिली आहे ?

० अशाप्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थीना रकाना / तक्त्यात लिहिलेली माहिती म्हणजे कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोहचणे हे लक्षात येईल इथपर्यंत आणून पोहोचवावे.

> सक्षम बनू या

● शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिनदर्शिका दाखवावी.दिनदर्शिकेच्या वाचनाकडे विविध प्रश्नांतून आणावे, जसेकी

१ ) तुमच्या घरी तुम्ही अशी दिनदर्शिका पाहिली आहे का ?

२) या दिनदर्शिकेतून आपल्याला काय

माहिती मिळते ?

३) बार कोठे लिहिले आहेत ?

४) महिना कोठे लिहिला आहे ?

५) सर्व महिन्यात दिवसांची संख्या सारखीच आहे का ?

६) वार किती आहेत ?

७) महिने किती आहेत ?

८) इंग्रजी महिने व मराठी महिने यांची नावे वाच. अशाप्रकारे विविध प्रश्न विचारून मुलांकडून दिनदर्शिकेचे आकलन पूर्वक वाचन करून घ्यावे.

> सराव करू या

शिक्षक विद्यार्थ्यांकडून दिनदर्शिकेचे वाचन करून घेतील.

दिनदर्शिकेचे वेगवेगळे पान वाचनास देऊन, त्यावर आधारित प्रश्न विचारावेत.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.