पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस एकविसावा| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या
शिक्षक मुलांना वाचनालयातील गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देतात. वाचताना गोष्टीचे शीर्षक, गोष्टीतील पात्र, आशय याकडे लक्ष देण्यास सांगतात. गोष्टीत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन वाचण्यास सांगतात. गोष्टीतून कोणता बोध होतो या कडे वाचताना लक्ष देण्यास
सांगतात.
+ सराव करू या
शिक्षकांनी “अकबर-बिरबल ” हे गोष्टीचे पुस्तक घेऊन प्रत्येक मुलाकडून एक एका गोष्टीचे प्रकट वाचन करून घ्यावे. ती मुलांना वाचायला द्यावीत आणि त्यांना उर्वरित गोष्टीवर इतर मुलांना प्रश्न विचारण्यास सांगावे.
+ कल्पक होऊ या
शिक्षकांनी काही अपूर्ण गोष्टीं लिहिलेली कार्ड बनवावीत ती मुलांना वाचायला द्यावीत आणि त्यांना उर्वरित गोष्ट बनविण्यास सांगावीत. पूर्ण झालेली गोष्ट वहीत लिहिण्यास सांगावी.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 21
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 21, समूहजीवनासाठी व्यवस्थापन
अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशु पक्ष्यांना खायला देणे. भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.
सराय करू या
प्र. 1) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ? से पुढे लिहा.
1) उदा. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे,
2)
3)
प्र. 2) तुमच्या घरी, परिसरात कोणकोणते कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात ?
प्र. 3) तुमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी (मोनिटर) च्या माध्यमातून वर्गात कोणती कामे होत असतात? त्याची यादी पूर्ण करा. उदा. वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे ना?
प्र. 4) पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमात व्यवस्थापन गरजेचे वाटते, योग्य ठिकाणी खूण करा.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :
१ तु पर्यावरणाचे रक्षण कसे कसे करतो?
२) सध्या दुष्काळ निवारण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत?
३) जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो ?