पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकविसावा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस एकविसावा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

शिक्षकांनी वर्गातील सर्व मुलांना नाट्यीकरणात सहभागी होण्याची संधी द्यावी. नाट्यीकरणात विद्यार्थी कशाप्रकारे नाटिकेचे सादरीकरण करतात हे जाणून घ्यावे.

4 सक्षम बनू या

• शिक्षकांनी नाट्यीकरण या संबोधा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

• नाटकाचा विषय, पात्रे, त्यांचे संवाद, वेशभूषा, देहबोली, हावभाव व आवाजातील चढउतारासह, स्पष्ट शब्दोच्चारासह नाटिकेचे वाचन, सादरीकरण, रंगमंच इ. नाटकाचे घटक समजावून सांगावेत. • शिक्षकांनीइ. ५वी पाठ्यपुस्तकातील ‘अति तिथं माती ‘यानाटकाचे नाट्य वाचन करून दाखवावे. • विद्यार्थ्यांना नाट्यवाचनासाठी वेळ द्यावा. नाटकातील पात्रे मुलांमध्ये वाटून द्यावीत. वर्गात नाटकाचे सादरीकरण करून घ्यावे. आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे..

* सराव करू या

• शिक्षकांनी गटागटात अति तिथं माती या नाटकाची तयारी करण्यास सांगावी. • वर्गात गटागटाचे सादरीकरण करून घ्यावे.

+ कल्पक होऊ या

• मुलांनी गटात नाटिका लिहून काढावी, नाटकाची तयारी करावी. वर्गात नाटकाचे सादरीकरण करून घ्यावे.

 विषय –  गणित 

आव्हान / कृती

कृती १ लंगडी खेळण्यासाठी वर्तुळाकार मैदान तयार करायचे आहे. तर कंपासने करता येईल का ? नसल्यास कोणत्या साहित्याच्या मदतीने करता येईल. (शिक्षकाच्या मदतीने मैदान तयार करा.)

कृती २ वेगवेगळ्या प्लेटच्या मदतीने वर्तुळाकार कागद कापा. त्यास घड्या घालून पुढील बाबी दाखवा. त्रिज्या, व्यास, जीवा.

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 21

समजून घेऊयाः संसर्गजन्य रोग, संपर्कातून होणारे रोग

संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 21 (संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध)

अध्ययन निष्पत्ती : स्वच्छता, आरोग्य / कचरा / आपत्ती आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगल इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून काळजी

घेतात.

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन अनुभव / कृती – संदर्भ:- इयत्ता पाचवी, विषय: परिसर अभ्यास १, प्रकरण : पृथ्वी व जीवसृष्टी

काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही..

अधिक माहिती येथून मिळेल – https://diksha.gov.in/dial/55X110

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. पृथ्वीवरील जलावरणात कशाचा समावेश आहे?

२. भूजल म्हणजे काय?

३. महासागर मानवासाठी कसा महत्त्वाचा आहे ते लिही.

४. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?

५. सर्वात लहान खंड कोणता?

६. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात कोणकोणत्या खंडाचा भाग येतो?

७. कोणत्या महासागराची सीमा हिंदी महासागराच्या सीमेला जुळत नाही?

अधिक सराव करू

१. दक्षिण महासागरविषयी अधिक माहिती मिळव.

२. जगाच्या नकाशात खंडाची नावे अचूक लिही.