इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 35
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतिपत्रिका : १९
समजून घेऊ या परिसरातील वनस्पती व पिके. : संदर्भ : इयत्ता दुसरी बालभारती २.१ अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होती. लक्षात घेऊ या :
वनस्पती म्हणजे लहान-मोठी सर्व प्रकारची झाडे. आपल्या परिसरात विविध झाडे आहेत. वनस्पतींपासून आपल्याला धान्य मिळते. उदाहरण- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, इ.

वनस्पतींपासून फुले, फळे, औषधे, लाकूड, सावली मिळते. वनस्पतींपासून मसाल्याचे पदार्थ, तेल मिळते. आपल्याला अन्नासाठी, कपड्यांसाठी व घरांसाठी वनस्पती अतिशय उपयोगी असतात. वनस्पतींची लागवड करावी व त्यांची काळजी घ्यावी. विनाकारण वनस्पतींचा नाश करू नये.
सराव करू या :
१) नारळाच्या झाडापासून आपणास काय मिळते?
२) तुमच्या शेतात कोणकोणती पिके घेतली जातात?
३) शेतकरी शेतात कोणकोणती कामे करतो?
प्रश्न २) योग्य जोड्या लावा

प्रश्न ३) ठळक अक्षरातील नको ते शब्द खोडा.
१) बटाटा ही कंदभाजी / पालेभाजी आहे.
२) मोगरा ही सुवासिक वनस्पती आहे/नाही.
३) तीळ/ लवंग ही मसाल्याची वनस्पती आहे.
४) तुळस/कापूस ही औषधी वनस्पती आहे.
५) ऊसापासून तेल/ साखर मिळते.