इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 25
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

थोडे आठवूया
हे उदाहरण बघूया
एका चौरसाकृती जागेचे कुंपण तारेच्या एका घेऱ्याने वाढवायचे आहे. कुंपणाची एक बाजू २० मीटर लांब असल्यास एकूण किती तार लागेल?
उत्तर शोधण्यासाठी सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. आपण शिकलो की चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. कुंपणाची एक बाजू २० मीटर म्हणजे इतर पण २० मीटर, म्हणजेच २० मीटर + २० मीटर + २० मीटर + २० मीटर ८० मीटर ८० मीटर तार लागेल.
येथे आपण चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज केली यालाच चौरसाची परिमिती म्हणतात, ॐ चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज,
* आयताची परिमिती म्हणजे आयताची सर्व बाजूंची बेरीज.

