इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 25
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
मुद्द्यावरून गोष्ट लेखन
सक्षम बनू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्ट लिहिण्याविषयी व ती लिहिताना मुद्द्यांच्या वापरासंबंधी पुढीलप्रकारे मार्गदर्शन करावे. 1) मुद्द्यांमध्ये दिलेल्या व्यक्तींचे सविस्तर वर्णन करावे (नाव, बाह्यरूप, स्वभाव)
2) मुद्द्यांमध्ये स्थळ (निसर्ग, गाव, बाजार, शाळा, बाग वगैरे) दिले असेल तर त्या स्थळाचे वर्णन करावे.
3) मुद्द्यांवरून गोष्टीची मध्यवर्ती कल्पना निश्चित करावी
4) गोष्ट पूर्ण होण्यासाठी संबंधित पात्रांची निवड करावी, पात्रे मर्यादित असावेत,
(5) मुद्द्यांचे बारकाईने निरिक्षण करून घटनेचा क्रम निश्चित करावा.
6) घटनेची सुरुवात समस्या समस्येची सोडवणूक- समाधानकारक शेवट असा सर्वासाधारण क्रम असावा.
7) गोष्टीला अनुरूप नाव द्यावे.
(थोडक्यात कथेची सुरुवात कथेचा मध्य — कथेचा शेवट
(कथेला या सर्व बाबी असतात. तर या प्रत्येक बाबीचा विचार करत असताना कथेची भाषा, पात्र, प्रसंग, कथेमध्ये एक समस्या निर्माण होते
ती हळूहळू सुटत जाते. आणि शेवट होतो अशी कथा आम्हाला लिहायची आहे. त्यासाठी खालील मुद्यांच्या आधारे आपण कथा लिहू शकतो.)
गोष्टीचा मध्य/समस्या/अडचण
अडचण/सुटण्यास सुरुवात उपाय सापडणे
गोष्टीची सुरुवात (स्थळ व पात्राचे वर्णन), समस्या सुटणे, गोष्टीचा शेवट
विद्यार्थ्यांना गोष्ट लिहावी..
शेतकरी- आंब्याची बाग लावली- शेळ्या-मेंढ्या आंब्याची झाडे खाऊ लागली-बागेला निवडुंगाचे कुंपण- बागेला संरक्षण-बाग मोठी झाली खूप आंबे – खूप उत्पन्न शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला बाग व बागेचा जमाखर्च मुलगा मूर्ख व अविचारी-निवडुंगाचा उपयोग नसल्याने निवडुंग तोडतो- बागेतील झाडांची शेळ्या-मेंढ्या व लोकांकडून फळांची चोरी व नासधूस उत्पन्न कमी-चूक कळते.
कल्पक होऊ या
- शिक्षकांनी पुढील शब्दांच्या आधारे विद्यार्थ्यांना गोष्ट लिहायला सांगावी.
(बाग, डबा, शाळा, संध्याकाळी)
2) शिक्षक एका गोष्टीची सुरुवात फळ्यावर लिहून देतील व यावरून गोष्ट पूर्ण करण्यास सांगतील धान्याची पोती भरलेली बैलगाडी घेऊन खंडेराव बाजाराच्या गावाला निघाले होते. गाव मागे टाकून ते एका चढावर पोचले आणि अचानक बैल जागीच थांबले. काही केल्या पुढे जाईनातच………..