इ 5वी आजचा सेतू अभ्यास दिवस 24
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
चित्रावरून गोष्ट लेखन
चित्रांच्या सहाय्याने गोष्ट कशी तयार करायची याबद्दल मार्गदर्शन
1)सुरुवातीला चित्रांचे बारकाईने निरीक्षण करावे.
2) पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्राचे क्रमाने निरीक्षण करत जावे.
3) क्रमाने निरीक्षण केल्यानंतर काय घटना घडली असेल? याचा बारकाईने विचार करावा.
4)काय घटना घडली? हे निश्चित झाल्यानंतर पहिल्या चित्राकडे जावे व बारकाईने निरीक्षण करावे.
5) प्रत्येक चित्राचे दोन ते तीन वाक्यांमध्ये वर्णन लिहावे.
6)चित्रांचे वर्णन करत असताना चित्रामध्ये काय दिसत आहे व चित्रामागे काय आहे हेही बारकाईने जाणून घेऊन वर्णन लिहावे.
7) चित्रात व्यक्ती, प्राणी, मुले दिसत असतील तर त्यांना तुमच्या आवडीची नावे द्यावीत.
8) गोष्ट प्रभावी होण्यासाठी काही संवादात्मक वाक्ये समाविष्ट करावीत व योग्य विरामाचिन्हे वापरावीत.
9 गोष्ट पूर्ण झाल्यावर गोष्टीला नाव द्यावे.
खालील चित्र पहा व त्याच्या वरून गोष्ट आपल्या वहीत लिहा

