इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 23
विषय – मराठी
स्व अभिव्यक्ती लेखन
खालील कविता मोठ्याने वाचा
ऑमलेट (मंगेश पाडगावकर)
कोंबडीच्या अंड्यामधुन
बाहेर आले पिल्लू ;
अगदी होते छोटे
आणि उंचीलाही टिल्लू !
कोंबडी म्हणाली, ” पिल्लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे “
पिल्लू म्हणाले, “आई,
दुसरे नको काही;
छोट्याशा कपामधे चहा भरुन दे,
मला एका अंड्याचे ऑमलेट करुन दे !”
- ही कविता वाचून तुमच्या मनात काय आले ते आपल्या वहीत लिहा
खालील कविता तुमच्या मनाने पूर्ण करा
आपण सारे शाळेत जाऊ
…………………………..
…………………………..
…………………………..
…………………………..
