इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 22 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

एका शब्दाचे दोन अर्थ 

विद्यार्थ्यांनी  पुढील वाक्यांचे प्रकटवाचन घ्यावे.

1. नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर झाडाच्या बुंध्यात रुतला. 

2. कधीही हार न पत्कारलेल्या खेळाडूचा सरपंचांनी हार घालून सत्कार केला. 

3. मंदारची पुरी खोड मोडली. 

4. आंब्याच्या झाडाचे खोड मोठे असते. 

5. नावेतील माणसाचे नाव काय आहे? 

6. दर महिन्याला पेट्रोलचे दर कमी जास्त होतात.

ठळक केलेल्या शब्दांचे अर्थ समजावून घ्या

पुढे दिलेले शब्द घेऊन भिन्न अर्थ असलेल्या प्रत्येक शब्दाची दोन वाक्य लिहा.

उदा. भाव:- *भाव तेथे देव.

*साखरेचा भाव काय आहे?

१) नाद
२ ) मान
३) ऋण 
४)वर
५.अंक
६. पक्ष
७. वावर
८. जीवन

खालील कृती करा 

१. एकाच शब्दाचे दोन अर्थ असलेले २० शब्दांची यादी करा व प्रत्येकाचे एक एक वाक्य लिहा.

२. आपण बोललेल्या शब्दाचा दुसरी व्यक्ती वेगळाच अर्थ घेते असा अनुभव तुम्हाला आला आहे का ? तुमचा अनुभव आठ ते दहा वाक्यात सांगा किंवा लिहा.


Leave a comment