इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 21
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
श्रुतलेखन
पालकांनी विद्यार्थ्यांना स्वरचिन्हयुक्त शब्दांचे /वाक्यांचे श्रुतलेखन द्यावे.
उदा. पिशवी, पेशवाई, कैवारी, सौरभ इ.
आम्ही शाळेत वृक्षारोपण केले.
वरील शब्दांचे/वाक्यांचे लेखन करून घेऊन ते तपासतात व चुकीचे शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहिण्यास सांगावे.
सक्षम बनू या
श्रुतलेखन करताना पूर्णविराम स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह इत्यादी विरामचिन्हांचा वापर योग्य ठिकाणी करावा.
उदा. १. दिपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली.
२.महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?
अशा प्रकारची आणखी काही वाक्ये विद्यार्थांना श्रुतलेखनासाठी द्यावी.
विद्यार्थ्यांनी लिहिलेले वाक्य तपासावे विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुका दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहिण्यास सांगावे.