Infinix Hot 9 Pro: १० हजारांपेक्षा कमी किंमतीतील जबरदस्त फीचरचे २ फोन लाँच, जाणून घ्या डिटेल – infinix hot 9, hot 9 pro launched in india: price, specifications and features

[ad_1]

भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात येत आहे. दोन महिन्यापासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. परंतु, ३१ मे रोजी भारतातील लॉकडाऊन संपणार आहे. त्या आधीच केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना आपले उत्पादन विकण्याची परवानगी काही अटीवर दिली आहे. त्यामुळे भारतात फोनची लाँचिंग आणि विक्री सुरू करण्यात आली आहे. मोबाइल कंपन्यांना ग्राहकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत आहे. Infinix Hot 9 Pro आणि Infinix Hot 9 स्मार्टफोन्स शुक्रवारी भारतात २ स्मार्टफोन लाँच केले आहेत. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर देण्यात आलाा आहे. दोन्ही फोन एकसारखेच दिसतात. परंतु, या दोन्ही फोनमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. दोन्ही फोनमध्ये होल पंच डिस्प्ले डिझाईन देण्यात आली आहे.

​Infinix Hot 9 Pro आणि Infinix Hot 9 ची किंमत व उपलब्धता

maharashtra times

इनफिनिक्स हॉट ९ प्रोची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे तर इनफिनिक्स हॉट ९ स्मार्टफोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून करण्यात येणार आहे. इनफिनिक्स हॉट प्रोचा १२ जून रोजी दुपारी १२ वाजता तर हॉट ९ या फोनचा ८ जून रोजी दुपारी १२ वाजता सेल सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही फोनला कंपनीने ओशन ब्लू आणइ वॉयलेट कलर्समध्ये लाँच केले आहे.

​Infinix Hot 9 Pro, Infinix Hot 9 ची वैशिष्ट्ये

maharashtra times

इनफिनिक्स हॉट ९ आणि इनफिनिक्स हॉट ९ प्रो मध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट करते. हे फोन अँड्रॉयड १० वर चालतो. इनफिनिक्सच्या दोन्ही फोनमध्ये गीगाहर्ट्ज हीलियो पी२२ ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप

maharashtra times

इनफिनिक्स हॉट ९ प्रोमध्ये रियरवर क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये कॅमेऱ्याचा सेटअप तसेच व्हर्टिकल डिझाईन देण्यात आली आहे. इनफिनिक्स हॉट ९ प्रोमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा डेप्थ, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक अतिरिक्त लो लाइट सेन्सर दिला आहे. प्रो मॉडल मध्ये Quad-LED दिला आहे. इनफिनिक्स हॉट ९ मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यात क्सटम बोकेह, एआय एचडीआर आणि एईय ३ डी ब्यूटी यासारखे फीचर्स दिले आहेत.

सेल्फी कॅमेरा

maharashtra times

दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलाचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेरा स्क्रीनवर होल पंच डिस्प्ले दिला आहे. फ्रंटला एवन पोर्ट्रेट, एवन ३डी फेस ब्युटी, वाईड सेल्फी आणि एआर एनिमोजी यासारखे फीचर्स दिले आहेत. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी ३० तासांपर्यत चालते. यात ४जी टॉकटाईम, १३० तासापर्यंत म्युझिक प्लेबॅक, १३ तास पर्यंत गेमिंग आणि १९ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम देऊ शकते.

फिंगरप्रिंट सेन्सर

maharashtra times

इनफिनिक्स हॉट ९ प्रो आणि इनफिनिक्स हॉट ९ मध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉकचा सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ ५, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडियो, यूएसबी ओटीजी आणि एक मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. फोनमध्ये जी सेन्सर ई कम्पास, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि अॅम्बियंट लाइट सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये डीटीएस साऊंड सपोर्ट दिला आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment