फ्री कॉल आणि मोठी वैधता जिओ, एअरटेल, व्होडाफोनचे बेस्ट प्लान

[ad_1]

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेस आता सर्वांसाठी आवश्यक झाले आहेत. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या असंख्य लोकांना जास्त डेटा खर्च करावा लागत आहे. देशभरात इंटरनेटचा वापर गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड वाढला आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने मनोरंजन, वर्क फ्रॉम होम यामुळे इंटरनेट जास्त खर्च करावा लागत आहे. जर तुम्ही प्रीपेड प्लानने रिचार्ज करत असाल आणि ज्यात तुम्हाला १.५ जीबी डेटा किंवा त्यापेक्षा जास्त डेटा हवा असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास पर्याय आणले आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी हे खास प्लान आहे. या सर्व प्लानची वैधता जास्त आहे. पाहा, कोणकोणत्या प्लानमध्ये तुम्हला किती वैधता मिळते, तसेच या प्लानमध्ये काय बेनिफिट्स मिळतात….

​एअरटेलचा २४९८ रुपयांचा प्लान

maharashtra times

जर तुम्हाला जास्त इंटरनेट डेटा वापरायची सवय असेल तर या एअरटेलच्या प्लानमध्ये दररोज तुम्हाला २ जीबी डेटा मिळतो. एकूण डेटा ७३० दिला जातो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळण्यासोबतच या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. एअरटेल Zee5, Wynk Music, Airtel Xstream प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री अँटीव्हायरस शिवाय FASTag खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

​एअरटेलचा २३९८ रुपयांचा प्लान

maharashtra times

एअरटेलच्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा युजर्संना दिला जातो. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानच्या रिचार्जवर एकूण ५४७.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस युजर्संना मिळतात. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये Zee5, Wynk Music, Airtel Xstream प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री अँटीव्हायरस शिवाय FASTag खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

​एअरटेलचा १४९८ रुपयांचा प्लान

maharashtra times

भारती एअरटेलच्या या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना दर महिन्याला २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण डेटा २४ जीबी डेटा कंपनीकडून मिळतो. या प्लानमध्ये डेटा इतर प्लानच्या तुलनेत थोडा कमी मिळत असला तरी या प्लानमध्ये ३६०० एसएमएस दिले जातात. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच अनेक अतिरिक्त बेनिफिट्स दिले जातात. या प्लानमध्ये Zee5, Wynk Music, Airtel Xstream प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री अँटीव्हायरस शिवाय FASTag खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

​जिओचा २३९९ रुपयांचा प्लान

maharashtra times

रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ७३० जीबी डेटा युजर्संना कंपनीकडून दिला जातो. युजर्संना या प्लानमध्ये दररोज १०० एसएसएस दिले जातात. तसेच जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रिलायन्स जिओ सोडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये युजर्संला १२००० मिनिट दिले जातात. या प्लानची वैधता एक वर्ष म्हणजेच ३६५ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये जिओ युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते.

​जिओचा २१२१ रुपयांचा प्लान

maharashtra times

जिओच्या या प्लानध्ये युजर्संना दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये एकूण ३३३.५ जीबी डेटा युजर्संना दिला जातो. युजर्संना या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. तसेच उर्वरित नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १२ हजार मिनिट युजर्संना मिळतात. या सर्व सुविधासह जिओ युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता ३३६ दिवस इतकी आहे.

​जिओचा ४९९९ रुपयांचा प्लान

maharashtra times

रिलायन्स जिओचा जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्संसाठी हा प्लान खास आहे. या प्लानमध्ये ३६० दिवसांची वैधता देण्यात आली आहे. ३५० जीबी एकूण डेटा युजर्संना या प्लानमध्ये मिळतो. या प्लानमध्ये जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्संना १२००० मिनिट उपलब्ध करून दिले जातात. या प्लानमध्ये दररोज १०० मेसेज युजर्संना दिले जातात. या प्लानमध्ये युजर्संना जिओ अॅप्सचे कॉम्प्लेमेंटरी सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते.

​व्होडाफोनचा २३९९ रुपयांचा प्लान

maharashtra times

जर तुम्ही व्होडाफोनचे युजर्स असाल आणि तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा हवा असल्यास तुम्ही हा प्लान निवडू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी आणि एकूण ५४७.५ जीबी डेटा मिळतो. युजर्संना या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस सुद्धा दिले जातात. युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या शिवाय, युजर्संना या प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. युजर्संना या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते.

​व्होडाफोनचा १४९९ रुपयांचा प्लान

maharashtra times

व्होडाफोनच्या या प्लानमध्ये युजर्संना प्रत्येक महिन्याला २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच युजर्संना या प्लानमध्ये झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. युजर्संना या प्लानमध्ये महिन्याला २ जीबी या प्रमाणे वर्षभरात एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. तसेच ३६०० एसएमस युजर्संना मिळतात. या प्लानची वैधता ३६५ दिवस इतकी आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment