Nokia smartphones: नोकियाच्या फोनमध्ये खास फीचर, कॉल रेकॉर्ड करता येणार – nokia smartphones now support call recording in india

[ad_1]

नवी दिल्लीः नोकिया अँड्रॉयड वन स्मार्टफोमध्ये एक जबरदस्त फीचर आले आहे. नोकियाचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने ही घोषणा केलीआहे. भारतातील अनेक अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोन्सच्या गुगल फोन अॅपवर कॉल रेकॉर्डिंग फीचर देण्यात आले आहे. नोकिया फोनमध्ये हे नवीन फीचर युजर्संना व्हाईस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा देणार आहे. एचएमडी ग्लोबलचे चीफ फ्रोडक्ट अधिकारी जुहो सारविकस यांनी ही माहिती दिली आहे. भारतातील युजर्स या फीचरची खूप मागणी करीत होते. आता अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोन युजर्संला हे फीचर मिळणार आहे.

वाचाःwhatsapp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केले, असे जाणून घ्या

नोकिया फोनमध्ये अस अॅक्टिव करा फीचर
नोकिया फोनमध्ये हे फीचर हवे असल्यास युजर्संना प्ले स्टोरमध्ये फोन अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करावे लागेल. नोकियाचा स्मार्टफोन अँड्रॉयड १० सिस्टमचा सपोर्ट करणारा नोकियाचा फोन हवा आहे. रेकॉर्डिंग अॅक्टिव करण्यासाठी युजरला कॉल करताना केवळ रेकॉर्ड बटन दाबावे लागणार आहे. त्यानंतर कॉल रेकॉर्डिंग पर्यंत पोहोचण्यासाठी युजर्सला Recents टॅबवर जावे लागणार आहे. जर कॉलला रेकॉर्ड करण्यात आले असेल तर युजर्सला कॉन्टॅक्ट नावाने किंवा फोन नंबरच्या खाली रेकॉर्डेड लेबल दिसेल.

वाचाः दर दिवशी 3GB डेटा देणारे मस्त प्लान, फक्त ३४९ रुपयांपासून सुरू

नोकियाच्या या स्मार्टफोनसाठी खास फीचर
फोन युजर कॉल एन्ट्रीवर क्लिक केल्यानंतर प्ले बटन सोबत कॉल रेकॉर्डिंग प्लेअर येतो. कॉल रेकॉर्डिंग, क्लाउड मध्ये नव्हे तर युजरच्या फोनमध्ये ते सर्व सेव होईल. ज्या अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोनसाठी हे खास फीचर मिळणार आहे. त्यात Nokia 9 PureView, नोकिया 8.1, Nokia 8 Sirocco, नोकिया 7.2, Nokia 7.1, नोकिया 7 प्लस, Nokia 6.2, नोकिया 6.1, Nokia 6.1 Plus, नोकिया 4.2, Nokia 3.2, नोकिया 3.1 प्लस, Nokia 2.3 आणि नोकिया 2.2 या स्मार्टफोनचा समावेश आहे.

वाचाः BSNL युजर्ससाठी गुडन्यूज, प्रत्येक कॉलवर परत मिळणार पैसे

वाचाः शाओमी ते सॅमसंगपर्यंत लॉकडाऊनमध्ये हे स्मार्टफोन स्वस्त

[ad_2]

Source link

Leave a comment