[ad_1]
गुगलने भारत काय सर्च करीत आहे? (What is india Searching for). हा रिपोर्ट जारी केला आहे. यानुसार, करोना व्हायरसच्या विम्याचे कवच (विमा पॉलिसी) सर्वात जास्त लोकांनी सर्च केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हॉरर चित्रपट आणि सर्वश्रेष्ठ तेलुगु चित्रपट २०२० खूप सर्च करण्यात आले आहेत. यावरून लोक मनोरंजनासाठी अधिक वेळ देत असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन ग्रॉसरी डिलिव्हरी आणि रेशन दुकान सुद्धा खूप सर्च करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी यात वाढ झाल्याचे दिसत आहे. इम्यूनिटीमध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. व्हिटामिन सी मध्ये १५० टक्के, अधिक सर्चिंग करण्यात आले आहे. करोना विमामध्ये १२३० टक्के वाढ झाली आहे.
वाचाः UV Light रोबोट २ मिनिटात करोनाचा खात्मा करतो
भारतात लॉकडाऊन सुरु असल्याने शाळा कॉलेज बंद आहेत. त्यामुळे लोकांनी ऑनलाइन क्लासेस खूप सर्च केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३०० टक्के वाढ झाली आहे. हाऊ टू चेंज यूपीआय पीन २०० टक्के सर्च करण्यात येत आहे. तसेच वीज बिल कसे भरायचे? आणि वर्क फ्रॉम होम गेल्यावर्षीच्या तुलनेत १५० टक्के अधिक सर्च करण्यात आले आहे. छोले करण्याची रेसिपीत १४८ टक्के वाढ झाली आहे.
वाचाःमोटोरोलाचा आजपासून सेल, १० हजारांची कॅशबॅक ऑफर
corona insurance
[ad_2]
Source link