[ad_1]
एका डिजिटल मीडियाने आपल्या एका बातमीत हा दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Covid-19 संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु, हा लॉकडाऊन आणखी एका आठवड्यासाठी वाढवला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च, २०२० रोजी देशवासियांशी संवाद साधताना या लॉकडाऊनची घोषणा केली होती.
याला एक्सक्लुसिव रिपोर्टचे शीर्षक ‘Modi govt could extent coronavirus lockdown by a week a migrant exodus triggers alarm’ दिले होते. ज्यात हा दावा करण्यात आला होता की, लॉकडाऊन आणखी आठवडाभरासाठी वाढवला जाऊ शकतो. कारण, दिल्लीत पळून जाणाऱ्या लोकांनी करोना संसर्ग आणखी वाढवला आहे.
या बातमीत अनेक अफवाचा हवाला दिला आहे. परंतु, त्या सोर्सचे नाव दिले नाही. रिपोर्टमध्ये म्हटले की, या अधिकाऱ्यापैकी एक करोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य आहे.
रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, एका अधिकाऱ्याने हा लॉकडाऊन आणखी आठवडाभरासाठी वाढवला जावू शकतो. तर अन्य दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, करोना व्हायरस रोखण्यासाठी कमीत कमी आणखी दोन महिने लॉकडाऊन करावे लागेल, असा दावाही या बातमीत केला आहे.
खरं काय आहे?
या बातमीत (रिपोर्ट) करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत.
प्रसार भारती न्यूज सेवेने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याशी संपर्क साधून हे ट्विट केले आहे. देशात लॉकडाऊन वाढवण्याची सध्या कोणतीही योजना नाही.
PBNS ने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले. ‘Fake news alert. या आर्टिकलवरून PBNS ने कॅबिनेट सचिव यांच्याशी संपर्क साधला. कॅबिनेट सचिव यांनी स्पष्ट केले की, लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही.
FAKE NEWS ALERT PBNS got in touch with the Cabinet Secretary on this news article. The Cabinet Secretary expr… https://t.co/4YwvaOAWLk
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) 1585538479000
[ad_2]
Source link