[ad_1]
नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व लोक आपापल्या घरात बसलेले आहे. लोकांनी घरातच बसावे यासाठी इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन म्हणजेच (IBF) ने डीटीएच आणि केबल नेटवर्कला निवडक चॅनेल दोन महिन्यांसाठी मोफत दाखवण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलमध्ये सोनी पल, कलर्स रिश्ते आणि झी अनमोल या चॅनेलचा समावेश आहे. याआधी टाटा स्कायने आपल्या युजर्संसाठी फिटनेस चॅनेल फ्री उपलब्ध केले आहे.
आयबीएफने म्हटलेय, लॉकडाऊन दरम्यान सोनी वेटवर्कचे सोनी पल, झी टीव्हीचे झी अनमोल आणि कलर चॅनेलचे कलर्स रिश्ते हे चॅनेल दोन महिन्यांसाठी फ्रीमध्ये दाखवा. सोनी पल या चॅनेलची किंमत १ रुपया, स्टार उत्सवची किंमत १ रुपया आणि झी अनमोलची किंमत ०.१ रुपया होती. तर दुसरीकडे कलरने कलर रिश्ते चॅनेलची किंमत १ रुपया ठेवली होती. टाटा स्कायचा फीटनेस चॅनेल युजर्ससाठी फ्रीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हे चॅनेल ११० नंबरवर दिसते. या चॅनेलचे मोबाइल अॅपवर तसेच टीव्ही व्हिडिओवर पाहिले जावू शकते. या आधी कंपनी युजर्संकडन या चॅनेलसाठी २ रुपये प्रतिदिन या प्रमाणे पैसे वसूल करीत होती.
चीनमध्ये ३१ मार्चला Vivo S6 5G स्मार्टफोन लाँच होणार
[ad_2]
Source link