[ad_1]
लाँचिंग दरम्यान मोटो E6s ला केवळ ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले होते. व या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर ६ जार ९९९ रुपयात विक्री केला जात आहे. गरज पडल्यास या फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. नवीन कलरमधील २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले होते.
मोटो E6s ची खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमद्ये ६.१ इंचाचा आयपीएस एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन १५६०x७२० पिक्सल आहे. आस्पेक्ट रेशियो १८;९ आहे. फोनची स्पीड वाढवण्यासाठी ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड पाय ९.० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
मोटो E6s चा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात पहिला एफ २.० अपर्चर सह १३ मेगापिक्सलचा आणि एलईडी फ्लॅश लाइटसह २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी व व्हिडिओ कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. यासोबत ५ वॅट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. या फोनचे वजन १४९.७ ग्रॅम आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
मोबाइलवरून फोटो काढताना ‘या’ चुका टाळाच
सिनेमा-नाट्यगृह बंद, टिकटॉकर्संना ‘अच्छे दिन’
[ad_2]
Source link