coronavirus : करोना अन् अफवांचा महापूर – coronavirus and rumors on social media

[ad_1]

ओंकार गंधे

matatechkatta@gmail.com

फसव्या गोष्टींची ऑनलाइन विक्री

ऑनलाइन कोणतीही वस्तू विकली जाते, तिची किंमत कमी असते किंवा भरघोस सवलत मिळते. करोनाच्या भीतीचा गैरफायदा घेऊन काहींनी करोना विषाणूवर रामबाण उपाय या नावाखाली औषधे विकायला सुरुवात केली आहे. अगदी ९९ रुपयांपासून तर ९९९९ रुपयांपर्यंत या औषधांची किंमत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार करोनावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही. तसेच, करोनापासून बचाव होण्यासाठी आवश्यक मास्क, बनावट सॅनिटायझरची वाढीव किमतीमध्ये ऑनलाइन विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये.


सोशल मीडियावर अफवा पसरायला काहीतरी निमित्तच हवं असतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. करोना बाबतीत सध्या अनेक अफवा पसरत आहेत. काही अफवा या समाजकंटकांकडून मुद्दाम पसरवल्या जात असून, काही अफवा खोट्या आत्मविश्वासातून पसरत आहेत. करोनाचा संसर्ग नक्की कशामुळे होतो, याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. मांसाहार केल्याने करोनाची लागण होते हे त्या पैकीच एक. स्वतःच डॉक्टर असल्याच्या अविर्भावात अणे जण विविध मेसेज तयार करून आपापसात पाठवतात. त्यातून अफवा पसरतात, आणि खरा महत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहचत नाही. करोनामुळे सरकारने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत अशा अर्थाचे अनेक मेसेज, सरकारी खोटे कागदपत्र व्हायरल होत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. प्रत्येक जिल्ह्याच्या सायबर पोलिस विभागाकडून याबाबत ठोस पावले उचलली जात आहेत.


रॅन्समवेअर

करोनाच्या दहशतीचा फायदा घेऊन जगभरातील अनेक हॅकर्स लोकांना आमिष देऊन अथवा भीती दाखवून त्यांच्यावर हल्ले करत आहेत. गेल्या काही दिवसांत या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. करोनाच्या नावाने विविध ई-मेल पाठवले जात आहेत. या ई-मेलमध्ये एक लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यानंतर रॅन्समवेअर ‘लॉकी’चा हल्ला होतो. त्यानंतर कम्प्युटरवरील सर्व फाइल्स लॉक होतात. पुन्हा त्या फाइल हव्या आल्यास पैसे अथवा ऑनलाइन खंडणी मागितली जाते. पीडीएफ, एमपीथ्री किंवा फोटो स्वरूपातही हा हल्ला केला जातो. तसेच व्हॉट्सअॅपवरही असाच प्रकार सुरू आहे.

काय दक्षता घ्याल?

– करोना संदर्भात आलेल्या कोणत्याही ई-मेल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये.

– ई-मेल मधील कोणत्याही अनोळखी फाइल डाउनलोड करू नये किंवा उघडू नये.

करोना वेबसाइट

करोना विषाणूच्या नावाखाली जणू मोठा काळाबाजार सुरू झाला आहे. १५० पेक्षा जास्त खोट्या वेबसाइट करोनाच्या नावाने सुरू झाल्या असून, त्यातील करोना मॅप ही एक एक बनावट वेबसाइट असून, त्या वेबसाइटवर गेल्यास विविध मालवेअरचा हल्ला मोबाइल आणि कम्प्युटरवर होत आहे. ‘करोना मॅप’च्या खोट्या वेबसाइटवर एक मॅप दिला आहे असून, आजपावेतो कोणकोणत्या देशात किती रुग्ण सापडले आहेत याचा तपशील दिलेला आहे. परंतु, अशा वेबसाइट धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या खोट्या साइटवर जाणे सर्वांनी टाळायला हवे.

त्यामुळे सर्वांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे.


(लेखक सायबर सुरक्षा विश्लेषक आहेत.)

दीर्घ काळ बॅटरीसाठी करा डार्क मोड ‘ऑन’

करोनाः पाहा संपूर्ण राज्यांची हेल्पलाइन नंबर यादी

रिलायन्स जिओचा धमाका, फोनची किंमत ३९९ ₹

टीव्ही चॅनेल जास्त अन् बिल कमी करायचंय? ‘हे’ करा



[ad_2]

Source link

1 thought on “coronavirus : करोना अन् अफवांचा महापूर – coronavirus and rumors on social media”

Leave a comment