[ad_1]
फोटोः ‘जिओ फोन लाइट’; किंमत फक्त ३९९ ₹
सॅमसंग गॅलेक्सी A11 ची खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी ओ डिझाइन डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन ७२०x१५६० पिक्सल आहे. स्पीडसाठी या स्मार्टफोनमध्ये १.८ जीएचझेड ऑक्टा कोर चिपसेटचा वापर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ११ हा स्मार्टफोन दोन प्रकारात लाँच करण्यात आला आहे. यात २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज इंटरनल मेमरी आणि ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. गरज पडल्यास हा स्टोरेज एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट, रेड आणि ब्लू या चार रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात एफ, १.८ अर्पचरसह १३ मेगापिक्सलचा सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि तिसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी १५ वॅट चा फास्ट चार्जर सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉॉक फीचर दिले आहे.
स्टीव जॉब्सच्या या कम्प्यूटरची ३.४ कोटींना विक्री
[ad_2]
Source link