Yes Bank : Yes बँकेचा फ्लिपकार्ट, फोनपे, स्विगीला फटका – yes bank phonepe flipkart swiggy also affected by the moratorium

[ad_1]

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गुरुवारी येस बँकेवर स्थगिती प्रस्ताव आणल्याने या बँकेतील ग्राहकांना महिन्याला फक्त ५० हजार रुपये काढता येऊ शकणार आहे. अचानक उद्धभवलेल्या या संकटामुळे बँकेतील केवळ ग्राहकांच्याच तोंडचे पाणी पळाले नाही तर अनेक भारतातील अनेक थर्ड पार्टी अॅप्स आमि फिनटेक स्टार्टअप्सलाही फटका बसला आहे. येस बँकेचा सर्वाधिक फटका फोन पे PhonePe ला बसला आहे.

फोन पे सोबतच फुड डिलिव्हरी अॅप स्विगी आणि ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला फटका बसला आहे. सोशल मीडियावर अनेक फोन पे युजर्संनी देवाण-घेवाण वरून समस्या येत असल्याचे म्हटले आहे. फोनपे चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युजर्संना उद्धभवणारी समस्या ही येस बँकेच्या सध्याच्या कारणामुळे होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फोनपे याच स्टार्टअपपैकी एक आहे. फोनपे आणि स्विगी यांच्या यूपीआय देणारा सपोर्ट करणाऱ्या बँकांच्या यादीत येस बँकेचा समावेश आहे. म्हणून स्विगीने यूआयपी अकाउंटचा उपयोग करून जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय अॅपमधून काढून टाकला आहे. याच प्रमाणे फ्लिपकार्टने फोनपेचा उपयोग करून पैसे देण्याचा पर्याय काढून टाकला आहे.

फेसबुक कर्मचाऱ्याला करोनाची लागण, ऑफिस बंद

ओप्पोची स्मार्टवॉच लाँच, अॅपल वॉचला देणार टक्कर

४ कॅमेऱ्याचा विवो S1 Pro स्मार्टफोन स्वस्त



[ad_2]

Source link

Leave a comment