[ad_1]
कंपनीने जिओ फोनसोबत ४९ रुपयांचा प्लान लाँच केला होता. जिओ फोनच्या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत होती. परंतु, कंपनीने डिसेंबर मध्ये नवीन टॅरिफ सह हा प्लान बंद केला होता. आता पुन्हा हा प्लान लाँच केला आहे. परंतु, कंपनीने या प्लानची वैधता कमी केली आहे. जिओ फोनच्या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये आता केवळ १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, जिओवरून अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी २५० मिनिट कॉलिंग आणि २५ मेसेज करण्याची सुविधा मिळणार आहे.
जिओच्या ६९ रुपयांच्या या प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता आहे. परंतु, यात डेटा अर्धा दिला जात आहे. जिओ फोनच्या ६९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच, दररोज ५०० एमबी डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ फ्री कॉलिंग, अन्य नेटवर्कवर २५० मिनिटची कॉलिंग मिळणार आहे. जिओच्या मासिक प्लानची चर्चा केल्यास जिओचा ७५ रुपयांचा प्लान आहे. ज्यात २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा, जिओ ते जिओ कॉलिंग अनलिमिटेड आणि जिओ ते अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ५०० मिनिट्स दिले जाते. यात एकूण ५० मेसेज फ्री आणि सर्व अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते.
‘जेम्स बॉन्ड’ पेक्षा कमी नाही ट्रम्प यांचा ड्रायव्हर
[ad_2]
Source link