इ ५ वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – मराठी

स्वल्पविराम केव्हा वापरतात याची माहिती समजावून घ्या
उदा. १.एका जातीचे अनेक शब्द
२. छोटे छोटे वाक्य असल्यास
३. संबोधनाचे वेगळेपण दाखवण्यासाठी
४. हो, नाही यासारख्या शब्दांनी वाक्य सुरू झाल्यास
उदा. १.महेश,उमेश, गणेश, रमेश व सुरेश हे माझे मित्र आहेत.
२. सोहम, आपण घरी जाऊ.
३. हो, मी त्याला सांगितले.
(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. आमच्या बागेत आंबा चिकू पेरू ही फळझाडे आहेत.
2. विद्यार्थी मित्रांनो उद्या शाळेला सुट्टी आहे.
३. अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात.
(आ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात स्वल्पविराम आला आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा. I
1. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
२. पण नदी कशी बोलणार?
३. माधवने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
दररोजच्या बोलण्यामध्ये ज्या वाक्यामध्ये स्वल्पविराम असतो अशी पाच वाक्य लिहा.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी
Cách viết của bạn rất gần gũi và dễ hiểu.