♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान    

शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान    

शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

 विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी याकरिता   जानेवारी ते एप्रिलदरम्यान होणाऱ्या या उपक्रमात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

 राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक एम. डी. सिंह यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने शंभर दिवस वाचन अभियान सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवले जाणार आहे.त्यात बालवाटिका ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

त्यासाठी आठवडानिहाय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात वर्गातील वातावरण आनंददायी राखण्यासह विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे, गोष्टीचा शनिवार, रीड अलाऊड अशा मोबाईल उपयोजनांच्या वापराबाबत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन, वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम, वाचन मेळावे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आदी उपक्रम राबवले जातील. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, महापालिकेचा शिक्षण विभाग अशा स्तरांवर उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे.

शंभर दिवस वाचन अभियान