राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न चुकीचे असल्याचे निदर्शनास आले
पहिल्या पेपरमध्ये ११ चुका
१) मराठी पेपरमधील संच अ मधील १. जाहिरातीत प्रश्न ६ मध्ये सेलचा कालावधीच पर्यायांत दिलेला नाही.
२) प्रश्न १७ मध्ये सीडी हा शब्द शिडी असा दिला आहे.
३) प्रश्न २४ मध्ये प्रश्नात अ, ब, क, ड असे आहे; तर पर्याय मात्र १, २, ३, ४ असे दिले आहेत.
४) गणित विषयात प्रश्न ३० – वाढदिवसालाऐवजी वाददिवसाला असे छापले आहे.
५) प्रश्न ३२ मध्ये एकूण रक्कम ९८२८ होते आणि ५०० च्या ४० नोटांची रक्कम २०००० होते. प्रश्न चुकीचा.
६) प्रश्न ४० मध्ये प्रश्नात चौकट व त्रिकोण छापलेला नाही.
७) प्रश्न ४९ मध्ये वाढदिवसऐवजी बाढदिवस अशी छपाई.
८) प्रश्न ५७ मध्ये आकृती दुमडून घनाकृती ठोकळा तयार होत नाही.
९) प्रश्न ६० मध्ये वर्तुळात हा शब्द छापलेला नाही.
१०) प्रश्न ६७ मध्ये पर्याय चुकीचे आहेत.
११) प्रश्न ७३ मध्ये पर्याय दोन्ही बरोबर आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर क्रमांक १ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीचे असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
co88.org rút tiền lâu, thậm chí nhiều lần bị từ chối không rõ lý do