♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

विनादुर्बिण दिसणार ‘आयएसएस’

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हणजेच आयएसएस हे अंतराळात पृथ्वीभोवती फिरणारे संशोधन केंद्र आहे. फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठ्या आकाराचे हे स्थानक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० किमी उंचीवरून ताशी २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालते आहे. सध्या यात वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. हे स्थानक १४ ते १८ मे दरम्यान आपल्याला आयएसएस साध्या डोळ्यांनी एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे वेगाने जाताना दिसू शकणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक विनय जोशी यांनी सांगितले आहे.

खगोलात घडणाऱ्या विविध घटनांविषयी खगोलप्रेमींबरोबरच सामान्यांच्या मनातही मोठी उत्सुकता असते. त्यामुळे अशा घटनांकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. अशीच घटना आजपासून अनुभवण्यास मिळणार आहे. आज (१४ मे) रात्री ८:११ ते ८:१६ या वेळात आयएसएस दक्षिण आकाशात उगवून चित्रा आणि स्वाती या ताऱ्याजवळून जात ईशान्येला मावळेल. यावेळी याची दृश्यप्रत -३.४ असल्याने अत्यंत तेजस्वी दिसेल.

शुक्रवारी (१५ मे) संध्याकाळी ७:२४ ते ७:२९ या वेळात आयएसएस दक्षिणेला उगवून पूर्वेकडे जाताना दिसेल. शनिवारी १६ मे ला रात्री ८:१२ ते ८:१८ यावेळेत आयएसएस पश्चिमेला व्याध्याच्या ताऱ्याजवळ उगवत उत्तरेला ध्रुव ताऱ्यापर्यंत जाताना दिसेल. तर १७ मेच्या संध्याकाळी ७:२४ ते ७:३१ या वेळात आयएसएस पश्चिमेला व्याध्याच्या ताऱ्याजवळ उगवत उत्तरेला सप्तर्षींच्या जवळून जाताना दिसेल. १८ मे ला पहाटे ५:१५ ते ५:२१ या वेळेत आयएसएस वायव्येला उगवत गुरु-शनी यांच्या जवळून जाताना दिसेल. हे आयएसएस साध्या डोळ्यांनी पाहता येईल त्यासाठी दुर्बिणीची गरज नाही, असेही विनय जोशी यांनी सांगितले आहे.

[ad_2]

Source link