zynn: TikTok सारखेच हे अॅप आहे, व्हिडिओ पाहण्याचे पैसे मिळतात – a new tiktok clone hit the top of the app store by paying users to watch videos

[ad_1]

नवी दिल्लीः चीनचा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप TikTok चा आणखी एक स्पर्धक मार्केटमध्ये आला आहे. अचानकपणे प्रसिद्ध होत असलेला Zynn नावाचा हा अॅप सेम टू सेम टिकटॉक सारखाच आहे. विशेष म्हणजे या अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे अॅप युजर्सला अकाउंट बनवण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि फॉलो करण्यासाठी पैसे देत आहे. Mashable च्या एका रिपोर्टनुसार, या अॅपला मे महिन्यात लाँच करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसात हे अॅप अॅपल अॅप स्टोरचे नंबर वन फ्री अॅप बनले आहे. तसेच गुगल प्ले स्टोरवर सुद्धा हे अॅप टॉप टेन यादीत आले आहे.

वाचाः Redmi Note 8 Pro स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

Zynn अॅप पैसे देते
हे टिकटॉकचा क्लोन अॅप सारखेच आहे. यात इंटरफेस पासून ते व्हिडिओ प्ले करण्यापर्यंत सर्व काही टिकटॉक सारखे आहे. या दोन्ही अॅपमधील सर्वात मोठा फरक म्हणजे मध्यभागी डॉलरची प्रतिकृती आहे. एका काउंटडाऊन टाइमर चालतो. ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहता, हा टायमर सुरू होतो. यातून तुम्हाला पॉइंट मिळतात. या पॉइंट्सला तुम्ही नंतर रोख रकमेत किंवा गिफ्ट कार्ड्समध्ये बदलून घेऊ शकतात.

maharashtra times

Zynn app

एका रिपोर्टनुसार, या अॅपला चीनची कंपनी Kuaishou ने लाँच केले आहे. हे Douyin अॅप (टिकटॉकचे चायनिज व्हर्जन) नंतर चीनचा सर्वात मोठा सोशल व्हिडिओ अॅप आहे. Zynn प्रमाणे चीनमध्ये Kuaishou अॅप सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे देते.

असा झाला प्रसिद्ध
Zynn अॅप प्रसिद्ध होण्यास अनेक कारण आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांना पैसे मिळतात. दुसरे कारण म्हणजे, यात देण्यात आलेली रेफरल स्कीम आहे. referral scheme अतंर्गत युजर्संना आपल्या मित्रांना साईन अप केल्यानंतर सुद्धा पैसे मिळतात. हे अॅप पाच लोकांकडून साईन अप केल्यानंत ११० डॉलर म्हणजेच (जवळपास ८ हजार ३००) रुपये देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचाःवनप्लसच्या फोनवर १० हजारांपर्यंत सूट, जबरदस्त फीचर्स

वाचाःBSNLची भन्नाट ऑफर, ४ महिन्यांपर्यंत इंटरनेट सेवा फ्री

[ad_2]

Source link

Leave a comment