[ad_1]
वाचाः
PM मोदींची तरुण वैज्ञानिकांना भावनिक साद
गुगल आणि टेस्ला यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अॅपचा वापर करू नये, असे आधीच बजावले आहे. ब्लीपिंग कम्प्यूटर ने आपल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. झूम अॅपचे पाच लाख अकाउंट्स हॅक करण्यात आले असून ते डार्क वेबवर कमी किंमतीत खासगी माहिती विकली जात आहे. झूम अॅप युजर्सचा डेटा हॅकर्स फोरमवर विकला जात आहे. यासंबंधी सर्वात आधी एक एप्रिल रोजी सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने याची माहिती दिली होती. या रिपोर्टनुसार, डार्क वेबवर झूम अॅप युजर्सचा खासगी डेटा खूपच कमी किंमतीत विकला जात आहे. हॅकिंग बेकायदा आणि पासवर्ड आणि आयडीवरून म्हणजेच हॅकर्संना आधीच माहिती होती.
वाचाः
‘वनप्लस ८’ आणि ‘वनप्लस ८ प्रो’ लाँच
झूम अॅप युजर्संचा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचला कारण, त्यात त्यांचा ई-मेल आयडी, पासवर्ड, मीटिंगचे युआरएल आणि होस्ट यासारख्या माहितीचा समावेश आहे. यात २९० अकाउंट्स कॉलेज आणि विद्यापीठाशी संबंधित आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, ज्या युजर्संचा डेटा लिक झाला आहे. त्यात युनिव्हर्सिटी ऑफ वर्मोंट, डार्टमाऊथ, लाफयेते, फ्लोरिडा विद्यापीठ, कोलोराडो विद्यापीठ आणि सिटीबँक यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
वाचाः
करोनाः कर्नाटकच्या ‘या’ टेक्नोलॉजीचे कौतुक
[ad_2]
Source link